Bahurupi
BahurupiSakal

पुण्यात बहुरूपी, नंदीवाले आणि मरीआईवाल्यांना मिळाले रेशन; दानशूर मंडळींची मदत

राज्यातील भटक्या समाजातील पहाटे येणारे वासुदेव, पोलिस, डॉक्टर यांची हुबेहुब नक्कल करणारे बहुरूपी...
Published on

येरवडा (पुणे) - राज्यातील भटक्या समाजातील (Wandering Society) पहाटे येणारे वासुदेव, (Vasudev) पोलिस, (Police) डॉक्टर (Doctor) यांची हुबेहुब नक्कल करणारे बहुरूपी... (Bahurupi) स्वत:चे वर्तमान व भविष्य अंधकारमय असताना दुसऱ्यांचे उज्वल भविष्य सांगणारे कुडमुडे जोशी... व्यवस्थेच्या विरोधात असो कि गरिबीमुळे स्वत:च्या अंगावर आसूड मारून घेणारे मरीआईवाले अर्थात पोतराज आदींची लॉकडाउन (Lockdown) मध्ये परंपरागत असलेले अर्थचक्र थांबल्यामुळे उपासमारी सुरू झाली आहे. मात्र अशा निराशामय वातावरणात अशा कुटुंबाना मदत करण्यासाठी दानशूर मंडळी व संस्था पुढे येत असल्याचे सकारात्मक चित्र शहरात दिसत आहे. (In Pune Bahurupi Nandiwale and Mariaaiwale got rations Help from charitable people)

राज्यात भटक्या समाजातील हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या जाती परंपरागत गाणी म्हणणारे, वेशांतरकरणारे बहुरूपी, पाऊस येईल का नाही याचा अंदाज वर्तवणारे नंदीवाले, २१ व्या शतकात अजूनही डोक्यावर मरीआईचा देव्हारा घेऊन जाणाऱ्या महिला व स्वत:च्या पाटीवर आसूड मारून घेणारे पोतराज हे घरोघरी जाऊन भिक्षा मागून आपली उपजीविका करतात. मात्र गेल्या महिनाभरापासून लॉकडाउन लागल्यामुळे त्यांची उपासमार होत आहे. या भटक्या समाजापैकी असलेल्या नाथपंथी डवरी समाज अर्थात बहुरूपी यांची उपासमार होत असल्याची बातमी ‘सकाळ’ मध्ये 'बिन पगारी व फुल अधिकारी’ या मथळ्याखाली प्रसिध्द झाली होती. त्यानंतर अनेका दानशूर मंडळी व संस्थांनी शहरातील अशा भटक्या समाजातील विविध जातींच्या पालापर्यंत जाऊन शिधा पोहचविण्याचे काम केले.

Bahurupi
पाचवी-आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली

गुरूवारी (ता.६) व शुक्रवारी (ता.७) रोजी साधू वासवानी मिशनच्या वतीने समन्वयक सत्येंद्र राठी, रोहित सारडा यांनी विमाननगर, साकोरेनगर येथील पालांमध्ये राहणाऱ्या मरिआईवाले, नंदीवाले यांनी रेशन किट दिले. तर कात्रज गोकुळनगर येथील बहुरूपी कुटुंबांना सुध्दा रेशन किट दिले.

'शहरात सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे अनेक भटक्या समाजातील कुटुंब अडकून पडली आहेत. त्यांना त्यांच्या गावीही जाता येत नाही कि शहरात त्यांना मदत सुध्दा मिळत नाही. त्यामुळे साधू वासवानी मिशनच्या माध्यमातून पीठ, तांदुळ, डाळ साखर, तिखट मिठ पासूनच्या वस्तू देत आहोत.’’

- सत्येंद्र राठी, समन्वयक, साधू वासनवानी मिशन, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com