Pune Crime: पुण्यात 16 वर्षीय मुलाचे घृणास्पद कृत्य; घटनेने खळबळ

पुण्यात अतिशय धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे
Pune Crime
Pune Crimeesakal

पुण्यात अतिशय धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. अल्पवयीन मुलाने गायीवर शारीरिक अत्याचार केला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील फुरसुंगी भागात ही घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे. फुरसुंगी येथील कामठे आळी परिसरात १३ डिसेंबरच्या पहाटे ही घटना घडल्याचे उघड झाले आहे.

फुरसुंगी गावातील गणपती मंदिराजवळ असलेल्या मोकळ्या मैदानात बांधलेल्या गाईचे पाय बांधून एका अल्पवयीन माथेफेरू तरुणाने गायीवरती अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवले. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे फुरसुंगी परिसरात राहतात. घराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत त्यांनी त्यांची जर्सी जातीची गाय बांधली होती. दरम्यान पहाटेच्या सुमारास एका १६ वर्षीय अल्पवयीन तरुणाने या गाईचे पाय बांधून तिच्यासोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवले.

Pune Crime
Pune Crime : चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या

हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी पोलीस स्टेशन गाठत संबंधित तरुणाविरोधात तक्रार दिली आहे. याप्रकरणी भारतीय दंडात्मक कलम 377 अंतर्गत त्याच्यावर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरातील नागरिक चिंता व्यक्त करत आहेत. पोलीस आरोपीची अधिक चौकशी करत आहेत. हडपसर पोलिसांनी तातडीने त्या माथेफिरू तरुणाला अटक केली आहे.

Pune Crime
Pune Crime : पुण्यात चोरट्यांचा थेट डॉलर्सवर डल्ला; दाम्पत्याचे हिरे, सोन्याचे दागिनेही लुटले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com