importance of artificial intelligence skills in career growth India
sakal
पुणे
Pune News : तंत्रज्ञानातील बदलांसह नवीन कौशल्ये आत्मसात करा : डॉ. आनंद देशपांडे
importance of artificial intelligence skills in career growth India : डॉ. आनंद देशपांडे यांनी तंत्रज्ञानातील बदल, डिजिटल साक्षरता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता याबाबत विचार मांडले. नवीन कौशल्ये आत्मसात केल्यास संधी उपलब्ध होतात, तर पारदर्शक नेतृत्व कर्मचार्यांचा विश्वास जपते, असे त्यांनी सांगितले.
पुणे : बदलत्या तंत्रज्ञानात आपण संगणक नाही तर व्यक्तींशी स्पर्धा करत आहोत. नोकरी किंवा कामाची कोणतीही कमतरता नाही. त्यामुळे तंत्रज्ञानातील बदल लक्षात घेत त्यानुसार नवीन कौशल्य आत्मसात केल्यास अनेक संधी उपलब्ध आहेत, असे मत ‘पर्सिस्टंट सिस्टीम’चे संस्थापक-अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक डॉ. आनंद देशपांडे यांनी व्यक्त केले.

