inadequate budget allocation for Indian judicial system
sakal
पुणे
Judicial Budget : न्यायव्यवस्थेसाठी अर्थसंकल्पात तुटपुंजी तरतूद : ॲड. असीम सरोदे
inadequate budget allocation for Indian judicial system : केंद्रीय अर्थसंकल्पात न्यायव्यवस्थेसाठी अत्यल्प तरतूद केल्याने मूलभूत हक्कांची प्रकरणे प्रलंबित राहतात, अशी टीका ॲड. असीम सरोदे यांनी केली. न्यायव्यवस्था सक्षम करण्यासाठी केंद्र–राज्यांनी संयुक्त आर्थिक नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे : देशात न्याय मिळविण्याची प्रक्रिया दिवसेंदिवस अधिक खर्चिक होत आहे. न्यायव्यवस्थेसाठी केंद्र सरकारकडून अत्यंत अपुरी अर्थसंकल्पीय तरतूद केली जात आहे, अशी टीका ॲड. असीम सरोदे यांनी केली. नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात न्यायव्यवस्थेसाठी ठोस आणि स्वतंत्र तरतूद नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

