अन् अजित पवारांसमोरच फडणवीस म्हणतात, माझा आवाज... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अन् अजित पवारांसमोरच फडणवीस म्हणतात, माझा आवाज...

देवेंद्र फडणवीस बोलताना त्यांचा आवाज येत नव्हता, तेव्हा गर्दीतून आवाज, आवाज असे म्हणताच फडणवीस म्हणाले, 'माझा आवाज कोणी दाबू शकत नाही.'

अन् अजित पवारांसमोरच फडणवीस म्हणतात, माझा आवाज...

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हसते पुण्यातील बाणेरमध्ये उभारलेल्या स्वतंत्र कोविड हॉस्पिटलचे उदघाटन झाले. उदघाटनानंतरच्या कार्यक्रमात अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी झालेल्या कार्यक्रमाला पवार, फडणवीस यांच्यासह महापौर मुरलीधर मोहोळ, दोन्ही शहरातील प्रमुख लोकप्रतिनिधी, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे, अधीक्षक अभियंता युवराज देशमुख उपस्थिती होते.

या कार्यक्रमावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांचा आवाज येत नव्हता, तेव्हा गर्दीतून आवाज, आवाज असे म्हणताच फडणवीस म्हणाले, ''माझा आवाज कोणी दाबू शकत नाही.''  ते पुढे म्हणाले, कोरोनावर मात करण्यासाठी चांगल्या उपाययोजना हव्यात. लस येईपर्यंत असे हाॅसिपटल महत्वाचे असेल. या हाॅस्पिटलचा विस्तार व्हावा. महाराष्ट्रात तपासणी करण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे तपासणी करण्याचे प्रमाण वाढायला हवे.'' 

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, ''या आठवड्यात पुण्यात सव्वादोन हजार बेड उभे राहिले आहेत. नव्या चार कोविड केअर सेंटरपैकी बाणेरमध्ये सर्वाधिक चांगल्या व अत्यंत दर्जेदार सुविधा आहेत. पुण्यातील डॉ. नायडू हॉस्पिटलनंतर हे बाणेरचे हॉस्पिटल असेल.

दरम्यान, पुण्यातील पहिल्या जम्बो कोविड केअर सेंटरचे उदघाटन रविवारी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्या कार्यक्रमाला पवार यांच्यासह सर्वक्षीय नेते उपस्थितीत होते. मात्र, फडणवीस नसल्याने राजकीय क्षेत्रात उलट-सुलट चर्चा होती. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या माध्यमातून उभारलेल्या कोविड हॉस्पिटलच्या उदघाटनाच्या कार्यक्रमाला मात्र फडणवीस उपस्थित राहिले. 

(Edited by : Sagar Diliprao Shelar)