डंपरच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू;किरकटवाडी-नांदोशी रस्त्यावरील घटना | Pune accident news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

road accident in kirkitwadi
डंपरच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू;किरकटवाडी-नांदोशी रस्त्यावरील घटना

डंपरच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू;किरकटवाडी-नांदोशी रस्त्यावरील घटना

किरकटवाडी: किरकटवाडी-नांदोशी रस्त्यावर किरकटवाडी गावच्या हद्दीत एका व्यक्तीचा डंपर खाली चिरडून जागीच मृत्यू झाला आहे. तिपा गंगाराम गायकवाड (वय 59 रा. किरकटवाडी ) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे.(accident news in pune)

हेही वाचा: बोर्डाची ऑफलाइन परीक्षा कॅन्सल करा; निगडीत दहावी-बारावीच्या मुलांचे आंदोलन

मयत तिपा गायकवाड हे अनेक वर्षांपासून किरकटवाडी येथे म्हशीच्या गोठ्यावर मजूर म्हणून काम करत होते. दररोज ते म्हशी चारण्यासाठी नांदोशी- किरकटवाडी या गावांच्या शिवेवर घेऊन जात असत. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास म्हशी गोठ्याकडे घेऊन येत असताना नांदोशी-किरकटवाडी रस्त्यावर किरकटवाडी गावच्या हद्दीत फरशी कारखाण्यासमोर मागून खडी भरुन आलेल्या डंपरने त्यांना धडक दिली. डंपरच्या पुढच्या चाकाखाली चिरडून गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा: बोर्डाची ऑफलाइन परीक्षा कॅन्सल करा; निगडीत दहावी-बारावीच्या मुलांचे आंदोलन

घटनेची माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे, सहाय्यक पोलीस फौजदार प्रदीप नांदे, अजित शिंदे, पोलीस नाईक गणेश धनवे घटनास्थळी दाखल झाले होते. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला असून हवेली पोलीस ठाण्याकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.

Web Title: Incident On Kirkatwadi Nandoshi Road In One Killed On The Spot In Dumper Collision Kirkitwadi Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune Newsaccident
go to top