esakal | प्राप्तिकर विवरणपत्र भरणारे घटले - अनुराधा भाटिया
sakal

बोलून बातमी शोधा

Anuradha-Bhatia

‘उद्योगनगरीमध्ये प्राप्तिकर विवरणपत्र भरणाऱ्यांची संख्या गेल्यावर्षीच्या तुलनेत १४ हजाराने कमी आहे. तसेच ॲडव्हान्स टॅक्‍सचा भरणाही कमी झाला आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी यात वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्‍यकता आहे,’’ असे पुणे विभागाच्या प्रधान मुख्य प्राप्तिकर आयुक्‍त अनुराधा भाटिया यांनी गुरुवारी (ता. ५) सांगितले.

प्राप्तिकर विवरणपत्र भरणारे घटले - अनुराधा भाटिया

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी - ‘उद्योगनगरीमध्ये प्राप्तिकर विवरणपत्र भरणाऱ्यांची संख्या गेल्यावर्षीच्या तुलनेत १४ हजाराने कमी आहे. तसेच ॲडव्हान्स टॅक्‍सचा भरणाही कमी झाला आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी यात वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्‍यकता आहे,’’ असे पुणे विभागाच्या प्रधान मुख्य प्राप्तिकर आयुक्‍त अनुराधा भाटिया यांनी गुरुवारी (ता. ५) सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी करा ई-सकाळचे ऍप 

दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्‌स ऑफ इंडियाच्या पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे प्राप्तिकर विभागाने जाहीर केलेल्या ‘विवाद से विश्‍वास’ या योजनेची माहिती देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी प्राप्तिकर विभागाचे आयुक्‍त शौविक गुहा, अधिकारी नीरज बन्सल, अशोक कुमार पांड्ये, संदीप गर्ग, सीए संघटनेच्या अध्यक्षा सिमरन लिलवानी आदी उपस्थित होते. 

भाटिया म्हणाल्या, ‘‘गेल्या आर्थिक वर्षात उद्योगनगरी परिसरात तीन लाख ५४ हजार जणांनी प्राप्तिकर विवरणपत्र भरले होते. यावर्षी आतापर्यंत तीन लाख ४० हजार जणांनी विवरणपत्र भरले आहेत. ॲडव्हान्स टॅक्‍स जमा होण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. प्राप्तिकर विभागाकडून करण्यात येणाऱ्या सर्व्हे आणि सर्चेसमधील कराची वसुली होणे बाकी आहे. त्यामुळे वर्ष संपण्यापूर्वी हे उद्दिष्ट पूर्ण करण्याकडे चार्टर्ड अकाउंटंट्‌सनी लक्ष देण्याची गरज आहे.’’

केंद्र सरकारकडून नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘विवाद से विश्‍वास’ योजना काय आहे, त्याचा फायदा कुणाला होऊ शकतो, कराची रक्‍कम भरण्यासाठीची प्रक्रिया काय आहे, याची सविस्तर माहिती या वेळी देण्यात आली.

loading image