फातिमानगर ते हडपसर दरम्यान बीआरटीचा बट्ट्याबोळ; अपघातांच्या प्रमाणात वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

brt.jpg

शहरवासीयांचा पीएमपी बसप्रवास अधिक जलद व्हावा, या उद्देशाने 3 डिसेंबर 2006 रोजी मोठा गाजावाजा करून देशातला पहिला बीआरटी प्रकल्प (कात्रज ते हडपसर) सुरू झाला खरा, पण नियोजनाच्या अभावामुळे प्रारंभीपासूनच हा प्रकल्प कायमच वादात सापडत राहिला. नियमितची वाहतूक कोंडी, अपघातांच्या मालिकेने बीआरटी बदनाम झाली, तसेच राजकीय पक्षांच्या अनास्थेमुळे बीआरटीकडे दुर्लक्ष झाले. या अशा एक ना अनेक कारणांमुळे फातिमानगर ते हडपसर या दरम्यान बीआरटीचा अक्षरशः बट्ट्याबोळ झाला आहे. 

फातिमानगर ते हडपसर दरम्यान बीआरटीचा बट्ट्याबोळ; अपघातांच्या प्रमाणात वाढ

हडपसर (पुणे) : शहरवासीयांचा पीएमपी बसप्रवास अधिक जलद व्हावा, या उद्देशाने 3 डिसेंबर 2006 रोजी मोठा गाजावाजा करून देशातला पहिला बीआरटी प्रकल्प (कात्रज ते हडपसर) सुरू झाला खरा, पण नियोजनाच्या अभावामुळे प्रारंभीपासूनच हा प्रकल्प कायमच वादात सापडत राहिला. नियमितची वाहतूक कोंडी, अपघातांच्या मालिकेने बीआरटी बदनाम झाली, तसेच राजकीय पक्षांच्या अनास्थेमुळे बीआरटीकडे दुर्लक्ष झाले. या अशा एक ना अनेक कारणांमुळे फातिमानगर ते हडपसर या दरम्यान बीआरटीचा अक्षरशः बट्ट्याबोळ झाला आहे. 


- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सोलापूर रस्त्यावरील बीआरटी मार्गाच्या 80 टक्के लेन्स (स्वतंत्र मार्गीका) अज्ञात व्यक्तीने काढून टाकल्या आहेत. याबाबत वानवडी पोलिस ठाण्यात महापालिकेच्या पथ विभागाने अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बीआरटी मार्गीका काढून टाकण्याबाबत आंदोलने, नागरिकांच्या सह्यांची मोहीम राबवली होती, मात्र आता लेन काढल्या असल्या तरी या मार्गावरील वाहतूक कोंडी सुटलेली नाही. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नागरिकांच्या प्रतिक्रिया :
रवींद्र खरे : बीआरटी लेन काढल्यातरी रस्ता अरुंद पडत आहे. दुचाकी वाहने सायकल ट्रॅक व पदपथावरून धावतात. पदपथावर व सायकल ट्रॅक व सेवा रस्त्यावर व्यावसायिकांची अतिक्रमणे वाढली आहेत. बीआरटी बस नादुरुस्त होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. बसथांबे रस्त्याच्या मध्येच असल्याने रस्ता ओलांडताना अपघात होतात. सायकल ट्रॅक व पदपथांची अर्धवट कामे झाली आहेत. या मार्गावरील दोष दूर करून पुर्नररचना करणे आवश्‍यक आहे. 

संतोष भुमकर : खासगी वाहनांची संख्या कमी होईल आणि वाहतूक कोंडीही दूर होईल, या उद्देशाने सुरू केलेली बीआरटी पूर्णपणे अपयशी ठरली आहे. कोट्यवधी रुपये खर्च होऊनही नागरिकांना काहीच उपयोग झालेला नाही. त्यामुळे या मार्गावरील बीआरटीचा बोजवारा उडाला आहे. 

रामचंद्र सातव : बीआरटी मार्गातून जाणाऱ्या पीएमपी बसची संख्या कमी आहे. असे असताना बीआरटीसाठी रस्त्याचा मोठा भाग वापरला जातो. एक बस गेल्यानंतर दुसरी बस येईपर्यंत मोकळ्या वेळेत एसटी, खासगी बस आदी वाहनांना प्रवेश दिल्यास रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होईल. 

नितीन खरात : बीआरटी मार्ग केवळ पीएमपी बससाठीच असावा. पीएमपी बसची संख्या कमी असेल तर ती वाढवणे गरजेचे आहे. बीआरटीच्या मूळ संकल्पनेला हरताळ फासू नये. 

मराठा आरक्षणावरून शासनाचाच 'गोंधळात गोंधळ'; सुधारित आदेश काढल्याने विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा

प्रभावी उपाययोजनांची आवश्‍यकता 

खरे तर बीआरटीची संकल्पना शास्त्रशुद्ध आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणा-या प्रवाशांसाठी उपयुक्त अशीच आहे. तिला पीएमपीमध्ये आयुष्यात कधीही प्रवास न केलेल्यांनी बदनाम केले. त्याचा फटका पीएमपी प्रवाशांना तर बसलाच आहे. बीआरटीच्या अंमलबजावणीतील त्रुटी दूर केल्या, लेनचा वापर फक्त आणि फक्त पीएमपीसाठीच करू शकलो, तर या मार्गावरील बीआरटी यशस्वी ठरू शकते, हे सांगण्यासाठी कोणत्याही सल्लागाराची गरज नाही. 

सोलापूर रस्त्यावरील वाहतूक कोंडी व अपघात कमी करण्यासाठी सायकल ट्रॅक व पदपथ काढून टाकून रुंदीकरण केल्यास वाहतुकीसाठी रस्ता मोकळा मिळू शकेल, तसेच बसथांबे रस्त्याच्या मध्यभागी न ठेवता ते कडेला घ्यावेत, याबाबत संबधित विभागांना निवेदन दिले आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

- योगेश ससाणे, नगरसेवक 
 

 

हडपसर बीआरटी मार्गातील त्रुटी दूर करण्यासाठी आवश्‍यक त्या उपाययोजना तातडीने करण्यात येईल.

- व्ही. जी. कुलकर्णी, उपायुक्त पथविभाग, पुणे महापालिका 

Web Title: Increase Accidents Between Fatimanagar Hadapsar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top