संरक्षण क्षेत्राला ‘आत्मनिर्भर’करण्यासाठी अर्थसंकल्पातील संरक्षण निधीत वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lieutenant General J S Nain

पुणे : संरक्षण क्षेत्राला ‘आत्मनिर्भर’ करण्यासाठी संरक्षण निधीत वाढ

पुणे : जागतिक स्तरावरील घडामोडी पाहता भारतीय सशस्त्र दलांनी कठीण प्रसंगांसाठी कमी वेळेत तयार राहण्याची आवश्‍यकता आहे. स्वदेशी संरक्षण उत्पादनांमुळे देशाच्या सुरक्षेच्या गरजा सोडविण्याबरोबरच भारत हा शस्त्रास्त्र प्रणालीचा उत्पादक म्हणून जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करेल. असे मत दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे एस नैन यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चरच्या (एमसीसीआयए) वतीने परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संरक्षण प्रदर्शन आणि विक्रेता विकास मालिकेच्या सत्रात ते बोलत होते. या कार्यक्रमात विविध भागधारक, उद्योजक व लष्करी अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमात परिसंवादा व्यतिरिक्त स्वदेशी संरक्षण उत्पादनांचे प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले होते.

लेफ्टनंट जनरल नैन म्हणाले, ‘‘सरकारने व्यवसाय करण्याचे नियम सोपे केले असून उद्योग, जलदगतीने संशोधन आणि विकास तसेच खरेदी प्रक्रिया सोयीची व्हावी यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहे. याशिवाय संरक्षण संपादन प्रकियेत नवीन बदल आणि संरक्षण क्षेत्राला ‘आत्मनिर्भर’ करण्यासाठी अर्थसंकल्पातील संरक्षण निधीत वाढ केली आहे. यामुळे संरक्षण उत्पादनांच्या खरेदीला गती मिळेल. जगात युद्धाचे स्वरूप बदलत असताना पारंपरिक युद्धाला नॅनोटेक्नॉलॉजी, क्वांटम कॉम्प्युटिंग, कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय), मानवरहित आणि रोबोटिक प्रणाली अशा आधुनिक तंत्रज्ञानाने पूरक केले पाहिजे. .

Web Title: Increase Defense Funds Budget Self Reliant Indian Armed Forces

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top