
Pune Corporation : करारनाम्याच्या शुल्कात तीस वर्षानंतर वाढ
पुणे : पुणे महापालिकेत नोकरीला लागायचे असेल, किंवा मिळकत भाड्याने घ्यायचे असल्यास करार करावा लागतो. त्यासाठी दस्तावेज तयार केला जातो, त्याचे शुल्क तीन पट ते १५ पट वाढविण्याचा निर्णय ३० वर्षानंतर घेतला आहे.
पुणे महापालिकेच्या विधी विभागातर्फे विविध प्रकारचे कायदेशीर दस्तावेज केले जातात. यासाठी मसुदा फी आकारली जाते. दस्तावेजबाबत ठरविलेले मसुदा शुल्क आॅक्टोबर १९९१ पासून वाढलेले नाही. महापालिकेच्या महसुली खर्चात, भांडवली खर्चात दरवर्षी वाढ होते. इतर शुल्कही वाढवले जातात. पण, काररनाम्यांसाठीच्या मसुदा शुल्कात ३० वर्षापासून वाढ केली नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.
ही वाढ केली तर महापालिकेच्या उत्पन्नात देखील वाढ होऊ शकते, त्यामुळे आता थेट तीन पट ते १५ पट शुल्क वाढीचा प्रस्ताव नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत ठेवला होता. त्यास मंजुरी दिली आहे.
Web Title: Increase In Contract Fees After Thirty Years Pune Corporation
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..