esakal | मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मानधनात १६ हजार रुपयांची वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

Pune

मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मानधनात १६ हजार रुपयांची वाढ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

फुलवडे : राज्यातील १६ जिल्ह्यातील आदिवासी, दुर्गम भागातील नागरिकांना वैद्यकीय सेवा (Medical Services) मिळावी यासाठी नवसंजीवनी योजनेतून मानसेवी वैद्यकीय (Psychiatric Medicine)अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचा निर्णय शासनाने (Goverment) सन १९९५ मध्ये घेतला. त्यानुसार राज्यातील १६ जिल्ह्यांसाठी २८१ पदे निर्माण करण्यात आली.

pune

pune

या भरारी पथकातील बीएएमएस मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांची फक्त २४ हजार मानधनावर नेमणूक केलेली आहे. हे मानसेवी वैद्यकीय अधिकारी गेली अनेक वर्षे मानधनवाढीच्या प्रतिक्षेत होते. या आशयाची बातमी सकाळ वर्तमानपत्रातून ७ जुलै २०२१ रोजी प्रसिद्ध झाली होती. अखेर राज्यशासनाने शुक्रवारी ३ सप्टेंबर रोजी मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मानधनवाढीत १६ हजार मासिक वाढ करून २४ हजार मानधनावरून आता ४० हजार रुपये मानधन करण्यात येत असल्याचा शासन निर्णय आदेश काढला आणि मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरले. आमच्या मानधन वाढीच्या मागणीसाठी सकाळ वर्तमानपत्राचा मोलाचा वाटा असल्याचे सांगत अनेक मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सकाळ वर्तमानपत्राचे आभार मानले.

हेही वाचा: गणपतीपुळे पंचक्रोशीत ५०० वर्षांपासून एक गणपती प्रथा

"अनेक वर्षांपासूनची आमची मानधन वाढीची मागणी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आदिवासी विकास मंत्री डॉ. के. सी. पाडवी, आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच आरोग्य सचिव यांच्या सहकार्याने शासन निर्णय काढण्यात आला. याबाबत दैनिक सकाळने बातमी प्रसिद्ध करून आम्हाला जे बळ दिले त्याबद्दल त्यांचेही खूप खूप आभार. आज आम्ही पहिली लढाई जिंकलो आहे. आता आमची दुसरी लढाई समावेशनची आहे. आज आमच्या २८१ भरारी पथकातील वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या कुटूंबामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे."

- डॉ. शेषराव सुर्यवंशी, अध्यक्ष, अस्थायी मानसेवी वैद्यकीय अधिकारी.

"राष्ट्रवादी डॉ सेलच्या माध्यमातून डॉक्टरांचे प्रश्न नेहमी मांडत आहोत, आदिवासी भागातील भरारी पथकातील डॉक्टरांच्या मानधनवाढीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले. याकामी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तातडीने पावले उचलली व आदिवासी विकास विभागानेही सहकार्य केले. सकाळ वृत्तसमूहाने बाजू मांडल्याबद्दल त्यांचे विशेष आभार."

- डॉ. हरीश खामकर, जिल्हा सरचिटणीस, राष्ट्रवादी डॉ. सेल

loading image
go to top