
स्कूल बसच्या भाड्यात तिप्पट वाढ; पुणेकरांना महागाईचा झटका!
पुणे : वाढत्या महागाईमुळं मुलांना शाळेत ने-आण करणाऱ्या स्कूल बसच्या भाड्यातही मोठी वाढ झाली आहे. कोरोनाच्या पूर्वी जे भाडं होतं त्यापेक्षा तिप्पट वाढ स्कूल बस प्रोव्हायडर्सनी केल्यानं पुणेकर नागरिकांच्या खिश्यावर चांगलाच ताण आला आहे. टाइम्स ऑफ इंडियानं याबाबत वृत्त दिलं आहे. (increase in school bus fares triple Inflation hits Punekar people)
या भाडेवाढीबाबत बोलताना पालकांचं म्हणणं आहे की, कोरोनाच्या काळापूर्वी अर्थात दोन वर्षांपूर्वी आम्ही घरापासून पाच किमी अंतरावरील शाळेसाठी स्कूलबससाठी ३०,००० हजार रुपये वर्षाला मोजत होतो. यानंतर आता हे स्कूल बसवाले ७० ते १ लाख रुपये वर्षाचं भाड घेतं आहेत.
तर विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे बसचे मालक म्हणतात, "इंधनाचे दर प्रचंड वाढले आहेत तसेच दोन वर्षानंतर ही भाडेवाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षात आम्हाला काहीच मिळकत झाली नाही. तसेच काही कारणांमुळं आता बसचे ड्रायव्हर्स इतर व्यवसायात गेले आहेत. त्यामुळं ड्रायव्हर्सची कमतरता आहे"
बोट क्लब रोड इथं राहणाऱ्या दिव्या जगदाळे म्हणाल्या, "आमची मुलगी वडगावशेरी इथल्या शाळेत शिकते तिची शाळा आमच्या घरापासून पाच किमी अंतरावर आहे. तिला शाळेत सोडवणाऱ्या बससाठी मी वर्षभरासाठी ७२ हजार रुपये भरले आहेत. यामध्ये ड्रायव्हर्स सुट्ट्या आणि उन्हाळी सुट्टांचा महिना देखील वजा करत नाहीत. आम्हाला दोन मुलं असून आम्ही काम करणारे पालक आहोत. तरी देखील इतकं मोठं भाडं देणं आम्हाला परवडेनासं झालं आहे. अनेक पालकांनी आता आपल्या घरच्या कारमधूनच आपल्या पाल्याला शाळेत ने-आण करायला सुरुवात केली आहे"
Web Title: Increase In School Bus Fares Triple Inflation Hits Punekar People
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..