इंदापुरात बाजरीच्या क्षेत्रात वाढ, मक्याच्या पेरणीत घट 

विनायक चांदगुडे
Monday, 7 September 2020

इंदापूर तालुक्‍यात जूनपासूनच चांगला पाऊस झाल्याने बाजरीच्या पेरणीच्या क्षेत्रात या वर्षी 274 हेक्‍टर क्षेत्राने वाढ झाली आहे.  मात्र, मका पिकाखालील क्षेत्रात 1 हजार 543 हेक्‍टरने घट झाली आहे. 

शेटफळगढे (पुणे) : इंदापूर तालुक्‍यात जूनपासूनच चांगला पाऊस झाल्याने बाजरीच्या पेरणीच्या क्षेत्रात या वर्षी 274 हेक्‍टर क्षेत्राने वाढ झाली आहे.  मात्र, मका पिकाखालील क्षेत्रात 1 हजार 543 हेक्‍टरने घट झाली आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

इंदापूर तालुक्‍यात शेतकरी मॉन्सूनपूर्व पावसाच्या ओलीवर जून- जुलै महिन्यात पाऊस पडेल, या आशेवर बाजरीच्या पिकाची पेरणी करीत होते. परंतु, मागील चार वर्षांत खरिपातील बाजरीच्या पेरणीनंतर जून व जुलै महिन्यात पाऊस पडत नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांची बाजरीची पिके वाया जात होती. प्रसंगी शेतकऱ्यांचा पेरणीचा खर्च देखील निघत नव्हता.

मतदारांनो, तुम्ही जे पेरलंय, तेच उगवलंय

मात्र, या वर्षी जूनपासूनच चांगला पाऊस झाल्याने बाजरीच्या पिकांच्या पेरणीस शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले होते. त्यामुळे बाजरीच्या 1 हजार 205 हेक्‍टर क्षेत्रापैकी जवळपास 1 हजार 479 हेक्‍टर क्षेत्रावर बाजरीची पेरणी झाली होती. सध्या बाजरीचे पीक काढणीच्या अंतिम टप्प्यात आले आहे. अनेक वर्षानंतर यावर्षी शेतकऱ्यांना बाजरीच्या पिकाद्वारे उत्पन्न मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. 

पुण्यात अत्यवस्थ रुग्णांना रक्तदात्यांची प्रतिक्षा
 

तसेच, प्रतिवर्षी जून- जुलैमध्ये पाऊस होत नसल्याने शेतकरी हिरवा चारा म्हणून दुभत्या पशुधनासाठी मका पिकाची पेरणी करीत होते. त्यामुळे प्रतिवर्षी तालुक्‍यात 7 हजार 852 हेक्‍टर क्षेत्र मकेचे असायचे. मात्र, या वर्षी चांगला पाऊस झाल्याने शेतात व रान माळावर आलेल्या गवताचा काही उपयोग पशुधनाच्या चाऱ्यासाठी झाला. त्यामुळे मका पिकाखालील क्षेत्रात 1 हजार 543 हेक्‍टरने घट होऊन तालुक्‍यात 6 हजार 309 हेक्‍टरवर मक्‍याची पेरणी झाली आहे. मका पिकाच्या क्षेत्रात या वर्षी घट झाली असली, तरी शेतकऱ्यांनी चांगल्या पावसामुळे या घट झालेल्या क्षेत्रावर बाजरी व उसासारखी पिके घेण्यास प्राधान्य दिले आहे. 
 

पुणे महापालिकेला जमत नसेल तर जंबो लष्करी अधिकाऱ्यांकडे सोपवा

या वर्षी जूनमध्ये चांगला पाऊस झाल्याने इंदापूर तालुक्‍यातील बाजरीच्या पिकाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. जवळपास 1 हजार 479 हेक्‍टर क्षेत्रावर बाजरीची पेरणी या वर्षी झाली आहे. 
- बी. एस. रूपनवर, तालुका कृषी अधिकारी, इंदापूर  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increase in millet area in Indapur, decrease in maize sowing