भोरमध्ये कोरोना रुग्णांवर उपचारासाठी ही सुविधा

विजय जाधव
Thursday, 6 August 2020

भोर तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, आज (ता. ६) तब्बल १५ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे यांनी दिली.

भोर (पुणे) : भोर तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, आज (ता. ६) तब्बल १५ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे यांनी दिली. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी येथील राज्य सरकारच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरु करण्यात आले

भोर तालुक्यात ऑगस्ट महिन्यातील पहिल्या सहा दिवसात एकूण ५० जण कोरोनाग्रस्त झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. गुरुवारी भोर शहर १, तांबाड ३, वडगाव डाळ १, भोलावडे ५, उत्रौली १, कुसगाव १, नसरापूर २, वेनवडी १, असे एकूण १५ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. 

न्यायालयात केवळ तत्काळ प्रकरणांवर सुनवाई

भोर तालुक्यात ऑगस्ट महिन्यात १ तारखेला १४ जण, २ तारखेला ५ जण, ३ तारखेला १० जण, ४ व ५ तारखेला प्रत्येकी ३ जण आणि ६ तारखेला १५ जण कोरोनाग्रस्त झाले आहेत. सद्यस्थितीत भोर तालुक्यात ६ ऑगस्टपर्यंत एकूण २४९ कोरोनाग्रस्त आढळले आहेत. त्यापैकी केवळ ८ जण उपचार घेत असून, १६२ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. एकूण ८६२ जणांचे स्वॅब तपासले असून, ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी येथील राज्य शासनाच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरु करण्यात आले असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रेय बामणे यांनी दिली. आमदार संग्राम थोपटे यांनी पुण्यामध्ये मुख्यमंत्र्यांकडे याबाबत मागणी केली होती. सध्या रामबाग येथील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये कोरोनाचे ८ रुग्ण उपचार घेत आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increase in the number of corona patients in Bhor taluka