कोरेगाव पार्कमध्ये कसा शिरला कोरोना? का वाढतायत रुग्ण?  

koregaon park.jpg
koregaon park.jpg

घोरपडी (पुणे) : नाईट लाइफ, पार्टीज आणि पुण्यातील सर्वांत उच्चभ्रू लोकांचा परिसर म्हणून कोरेगाव पार्कची ओळख आहे. ओशो गार्डन, जर्मन बेकरी, मोठं मोठे हॉटेल, पब, सर्वांत महागडी घरे अशी अनेक वैशिष्ट्ये असलेला हा परिसर. पण, गेल्या काही दिवसांत हा परिसरात कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. सुरुवातीला कोरेगाव पार्क कोरना फ्री होता. हळू हळू या परिसरात रुग्ण वाढत गेले.


कोरेगाव पार्क म्हणजे, मिनी इंडिया 
कोरेगाव पार्क परिसर हा प्रभाग 21 मध्ये येतो. हा प्रभाग ताडीवाला रस्ता, कोरेगाव पार्क, घोरपडी पासून सोलापूर रस्त्यावरील मिरेकर वस्ती पर्यंत विस्तारलेला आहे. अति उच्चभ्रू आणि अत्यंत गरीब अशी दोन टोकाचे राहणीमान असलेले नागरिक येथे राहतात. कोरेगाव पार्क मधील साउथ मेन रस्त्यापलिकडे सगळे गरीब अलीकडे सगळे श्रीमंत व्यक्ती अशी स्पष्ट विभागणी येथे दिसते. पुण्यातील सर्वांत श्रीमंत उद्योजक, व्यावसायिक, बिल्डर यांचे प्रशस्त बंगले येथे आहेत. त्याच वेळी या परिसरात एका बंगल्याच्या जागेत मावेल अशा पाच झोपडपट्ट्या येथे पाहायला मिळतात. या वस्तीत सर्व जाती धर्माची लोक येथे राहतात. हिंदू, मुस्लिम, नवबौद्ध, मातंग, माळी, तेलगू, तमीळ, इसाई, राजस्थानी, गुजराती सर्व जाती- धर्माचे लोक इथे अनेक वर्षांपासून राहतात. या परिसरात बौद्ध विहार, मशीद, मंदिर, चर्च असे विविध धर्माचे प्रार्थना स्थळ आहेत. त्यामुळे मिनी इंडियाचे दर्शन येथे पाहायला मिळते. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दोन प्रमुख वस्त्यांमध्ये कोरोनाचा विळखा
प्रभागात एकूण 13 झोपडपट्टी पैकी दोन प्रमुख वस्तीमध्ये कोरोनाचा विळखा वाढत आहे. अडीच महिन्यांपासून कोरोनाचे संकट असताना या परिसर ग्रीन झोन मध्ये होता. मार्च महिन्यात अगदी मोजके चार - पाच रुग्ण सापडले होते. मात्र मे महिन्याच्या अखेरीस या परिसरातील झोपडपट्टी परिसरात मोठ्या वेगाने कोरोना पसरू लागला. या परिसरात रेल्वेच्या कडेला असलेली छोटीशी झोपडपट्टी आहे. ती म्हणजे गाडगे महाराज वसाहत. येथे राहणारे बहुतांश नागरिक हे चतुर्थ श्रेणीमध्ये विविध हॉस्पिटल, हॉटेल व पब आणि सोसायटीमध्ये काम करतात. या प्रभागात रूबी हॉल, जहांगीर हॉस्पिटल, वाडिया हॉस्पिटल, इनलॉक्सस बुधराणी हॉस्पिटल आणि जवळच असलेले ससून रुग्णालय यामध्ये परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर कामाला आहेत. याच हॉस्पिटलमध्ये काम करत असल्यामुळे वस्तीत कोरोनाचा शिरकाव झाला. त्याचवेळी सरकारने दारू खरेदीसाठी परवानगी दिली.

वस्तीतीतील मद्यप्रेमी बाहेर पडले. यामुळे लॉकडाउन चारच्या अखेर पर्यंत वस्तीची शिस्त बिघडली. त्यामुळे वीस मे रोजी पहिला रुग्ण सापडला, त्यानंतर मात्र, वस्तीत रोज नवीन रुग्ण सापडत गेले. एका दिवसात पन्नास ते शंभर रुग्ण अशी आकडेवारी वाढत गेली. 
आज साडेचारशे पेक्षा जास्त रुग्ण एका संत गाडगे महाराज वसाहतीमध्ये आहेत. तर शेजारील कवडे वस्ती येथे जवळपास दीडशे रुग्ण आहेत. रोज पोटापाण्यासाठी कामावर जाणारे नागरिक आता मात्र वस्तीत अडकून पडले आहेत. दहा बाय दहाची खोली, छोट्या छोट्या गल्ली, लहान घरे असल्यामुळे स्वतंत्र शौचालयाचा अभाव तसेच सार्वजनिक शौचालय यामुळे इथे स्वच्छता आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे कठीण आहे. सरकारच्या व काही संस्थांच्या मार्फत धान्य वाटप करण्यात आले. मात्र, एकीकडे या आजाराशी आणि पोटात पडणाऱ्या आगीशी अशी दुहेरी लढाई येथील नागरिक लढत आहे.

वस्तीत परिसरातील हॉस्पिटल मध्ये काम करणारे लोक मोठ्या प्रमाणावर राहतात. त्यामुळे परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढला. संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे. येथे मनपाच्या वतीने रोज तीन चार वेळा स्वच्छता होते. तसेच सर्व घरांमध्ये किट वाटप केले. वस्तीतील वाढती रुग्ण संख्या पाहून स्वॅब सेंटर येथे उभारले असून घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू आहे. त्यानुसार उपाय योजना करण्यात येत आहे.
- दयानंद सोनकांबळे, सहाय्यक आयुक्त, ढोले-पाटील क्षेत्रीय कार्यालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com