esakal | पुण्यातल्या लॉकडाउनचं काय होणार? वाचा व्हायरल मेसेजमागचं सत्य 
sakal

बोलून बातमी शोधा

pune lockdown extension rumors dr deepak mhaisekar statement

राज्यात लॉकडाऊन आणखी वाढवण्यात येणार, अशी चर्चा सोशल मीडियामध्ये सुरू होती. या संदर्भात स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करून लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही.

पुण्यातल्या लॉकडाउनचं काय होणार? वाचा व्हायरल मेसेजमागचं सत्य 

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पुणे : राज्यात लॉकडाउनमध्ये वाढू शकतो, या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एका विधानाने संपूर्ण महाराष्ट्रात अक्षरशः खळबळ उडाली. अनेक शहरांमध्ये लॉकडाउनमध्ये वाढ होणार असल्याची अफवा पसरली. अखेर स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर खुलासाही केला. पण, अफवा पसरवणाऱ्यांचं तोंड कोण बंद करणार? लॉकडाउनमध्ये वाढ होणार असे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता त्यावर पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी खुलासा केलाय.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आणखी वाचा - संभाजीराजे पुण्याच्या तरुणाला म्हणाले छत्रपतींचा मावळा

लॉकडाऊन वाढविण्याबाबत अद्याप कोणताही विचार नाही. तसेच, राज्य सरकारने याबाबत कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. राज्यात लॉकडाऊन आणखी वाढवण्यात येणार, अशी चर्चा सोशल मीडियामध्ये सुरू होती. या संदर्भात स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करून लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही. लोकांनी गर्दी करण्यापासून टाळावे. सुरक्षित राहण्यासाठी व काळजी घेण्याबाबत सरकारच्या सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

आणखी वाचा - सिंहगडरोडवर हॉटेल चालकाचा खून

'मिशन बिगिन अगेन' सुरू
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही लॉकडाउनबद्दल अफवा पसरवू नका. महाराष्ट्रामध्ये 'मिशन बिगिन अगेन' सुरू आहे. जनतेला पुन्हा लॉकडाऊनला सामोरे जाऊ नये, म्हणून मुख्यमंत्र्यांनी जनतेला प्रशासनाने सांगितलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांची सुरक्षा हेच सरकारचे प्राधान्य राहणार आहे, असे आवाहन ट्विटद्वारे केले आहे. तसेच, या संदर्भात विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, 'लॉकडाऊन वाढविण्याबाबत राज्य सरकारच्या कोणत्याही सूचना नाहीत किंवा तसा विचारही नाही. अशा स्वरूपाचा कोणताही प्रस्ताव राज्य सरकारला पाठविण्यात आलेला नाही. 'मिशन बिगिन अगेन' सुरू राहील. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.'

loading image
go to top