पुणे जिल्ह्यामध्ये ६० दिवसांत एक लाख सक्रिय रुग्णांत वाढ

 increase of one lakh active corona patients in 60 days in Pune district
increase of one lakh active corona patients in 60 days in Pune district
Updated on

पुणे : पुणे जिल्ह्यात अवघ्या ६० दिवसांमध्ये कोरोनाच्या सक्रिय रुग्णांच्या संख्येने एक लाखाचा टप्पा ओलांडला. जिल्ह्यात ११ मार्चला सर्वांत कमी कोरोनाचे सक्रिय रुग्ण होते. आता ११ एप्रिलला ही संख्या एक लाख दोन हजारांवर पोचली.कोरोनाच्या पहिल्या लाटेत गेल्या वर्षी १६ सप्टेंबरला पुणे जिल्ह्यात कोरोनाचे ८२ हजार १७२ सक्रिय रुग्ण होते. त्यानंतर रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत गेली. ती ११ फेब्रुवारीपर्यंत सर्वांत कमी नोंदल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली. सक्रिय रुग्णांची संख्या त्यानंतर पुन्हा वाढायला लागली. अवघ्या महिनाभरात हा आकडा २१ हजार २७६ पर्यंत वाढला. मात्र, त्यानंतरच्या तीस दिवसांमध्ये सक्रिय रुग्णांनी एक लाखाचा टप्पा ओलांडला, अशी माहिती आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली.

हेही वाचा - VIDEO: फक्त VIP नाच ट्रीटमेंट आहे का? रेमडेसिव्हीरसाठी पुण्यातील महिलेचा हंबरडा

कोरोनामुक्तांचे प्रमाण घसरले
कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण फेब्रुवारीमध्ये ९६.६ टक्के होते. म्हणजे, प्रत्येक शंभरपैकी ९६ रुग्ण खडखडीत बरे होत. गेल्या दोन महिन्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक वाढला. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्यांपेक्षा कोरोनाबाधितांची संख्या वाढली. त्याचा थेट परिणाम कोरोनामुक्त होणाऱ्यांचा दर ९६.६ टक्क्यांवरून ८२.७ टक्क्यांपर्यंत खाली आला, असे निरीक्षणही आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी नोंदविले.

हेही वाचा - पुण्यात रेमडेसिव्हिरसाठी 'कोन्ट्रोल रुम'; गरजूंना टोल फ्री क्रमांकावर संपर्काचं आवाहन

मृत्यूदर सर्वांत कमी
पुणे जिल्ह्यात गेल्या १२ एप्रिलला सर्वाधिक मृत्यूदर नोंदला गेला. तो ११.४ टक्के होता. लवकर निदान, प्रभावी उपचार यामुळे मृतांचा आकडा आता. १.३ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात यश मिळाले आहे. एका बाजूला कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असला तरीही मृत्यूदर वाढला नाही, ही मोठी जमेची बाजू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com