मोशीत आता 'या' आजाराने नागरिक त्रस्त; रुग्णांमध्ये होतेय दिवसेंदिवस वाढ

मोशीत आता 'या' आजाराने नागरिक त्रस्त; रुग्णांमध्ये होतेय दिवसेंदिवस वाढ

मोशी (पुणे) : मोशी गावठाण, सर्व वाड्या-वस्त्यांसह अतिशय स्वच्छ आणि सुंदर समजल्या जाणाऱ्या मोशी प्राधिकरण परिसरातील नागरिकांमध्येही पोटदुखी आणि अतिसार या आजाराचे रुग्ण वाढत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून आल्या आहेत. कोरोनाने आधीच नागरिकांमध्ये धास्ती आहे. त्यात आता पोटदुखी व अतिसार या आजाराने नागरिकांना ग्रासलंय. त्यामुळे घबराट निर्माण झाली आहे. या बाबत नागरिकांनी प्रशासनाकडे पिण्याच्या पाण्याची तपासणी करण्याची मागणी केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   
     
मोशी उपनगरातील वाढत चाललेले कोरोनाच्या या आजाराबरोबरच सध्या एका पोटदुखी व अतिसाराने मोशी गावठाण, पुणे-नाशिक महामार्गावरील पूर्व-पश्चिम बनकर वस्ती, बोराटे वस्ती, तापकीर नगर, आदर्श नगर, खानदेश नगर, साईनाथ कॉलनी, श्री नागेश्वर महाराज उपबाजार समिती ते सीएनजी गॅस पंप या रस्त्यावरील आल्हाट वाडी, सावतामाळी नगर, बोऱ्हाडे वस्ती, जाधववाडी, लिंक ते देहू, मोशी या बीआरटीएस रस्त्यापर्यंतच्या विविध सोसायट्या, देहू ते मोशीतील भारत माता चौकापर्यंतच्या बारणे वस्ती, सावतामाळी कॉलनी, बोराटेनगर, हिंगणेनगर, टोल नाक्याजवळील गायकवाड वस्ती, तुपे वस्ती, मोशी आळंदी या बीआरटीएस रस्त्यावरील सस्तेवाडी,  हवालदार वस्ती, डुडुळगाव मधील तळेकरनगर,  वहिलेनगर, शिवाजीवाडी, कुदळे वस्ती या परिसरातील नागरिकांनी विविध अंतर्गत रस्त्यांवर जुना मोशी आळंदी रस्त्यावरील सस्तेवाडी गायकवाड वस्ती, अल्लाट वाडी दक्षिण-उत्तर, लक्ष्मीनगर, कुदळे वस्ती, मोशीतील श्री नागेश्वर महाराज मंदिरासमोरील मुख्य चौकामधील रस्त्यावरील, पुणे नाशिक महामार्गालगतच्या सस्ते नगर, पूर्व बनकर वाडी, तापकीरनगर, गंधर्वनगरी खानदेशनगर, आदर्शनगर, साईराज सोसायटी, राजा शिवछत्रपती चौक यादरम्यानच्या महामार्गावरील, राजा शिवछत्रपती चौक ते टाटा मोटर्स मटेरियल गेट यादरम्यानच्या स्पाईन रस्त्यावरील पदपथावर, मोशी प्राधिकरणातील पेठ क्रमांक 4, 6, 9 परिसरातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, स्पाईन सिटी व्यापारी संकुल, संत गजानन चौक, राजा शिवछत्रपती चौक येथील जय गणेश साम्राज्य व्यापारी संकुल, पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरासह, पेठ क्रमांक 4, 6, 9 आदी परिसरात या आजाराने अनेक नागरिक त्रस्त झाले असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यामुळे या परिसरातील संदेश आल्हाट, गणेश आंबेकर, सचिन बारणे, रवी बोऱ्हाडे, राजू आल्हाट, चंद्रकांत तापकीर, सागर तापकीर, विठ्ठल वाळुंज, रामदास गायकवाड, चंद्रकांत गिलबिले, रोहिदास हवालदार, सागर तळेकर, सचिन वहिले आदींशी संपर्क साधला असता आमच्याही परिसरातील विविध चाळी, कॉलन्या, सोसायटी यामधील नागरिकांना हाच त्रास मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे त्यांनीही या 'पोटदुखी व जुलाब हा आजार' वाढल्याच्या या वृत्तास दुजोरा दिला आहे. 

यामधील संदेश आल्हाट यांनी कचरा व अशुद्ध पाणी असलेल्या पाण्याच्या बाटल्या दाखवल्या. त्यांच्या कुटुंबातील लहान-मोठे पोटदुखी व जुलाब या आजाराने सध्या त्रस्त असून, सर्वांना दवाखान्यात घेऊन जावे लागले आहे. दुसरीकडे आल्हाटवाडी येथील कृषीमित्र राजू आल्हाट व तापकीरनगर येथील गणेश आंबेकर यांनी सांगितले की, गेली चार दिवस आम्ही मोशीतील खासगी रुग्णालयात याच पोटदुखी व अतिसार या आजारामुळे अ‍ॅडमिट होतो. त्यामुळेच आरोग्य विभाग व पाणी पुरवठा विभागाने तत्काळ परिसरातील पिण्याच्या पाण्याची तपासणी करून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी परिसरातील स्थानिक नागरिकांमधून जोर धरु लागली आहे. 

याबाबत मोशी उपनगर पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रविण लडकत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, "हा प्रश्न एकट्या मोशी उपनगरातीलच नाही तर संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात निर्माण झाला आहे. आम्ही सर्व पाणीपुरवठा अधिकारी, कर्मचारी या विषयावर अभ्यास करत आहोत. पाण्यातील क्लोरीनचे व स्वच्छतेचे प्रमाणही योग्य आहे. तरीही नेमका पाण्यामुळेच हा प्रश्न निर्माण झाला आहे का? या बाबत वरिष्ठ पाणीतज्ज्ञ व शहरातील विविध डॉक्टर यांच्याशीही बोलणे सुरु आहे. सध्या सुरु असलेली कोरोनाचे साथ लक्षात घेत हा प्रश्न तत्काळ सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत." 

चीनवर आता नवं संकट; तब्बल १०६ जणांचा मृत्यू
    
याबाबत मोशी उपनगरातील अनेक डॉक्टरांशी संपर्क साधला असता, त्यांनीही या पोटदुखी व अतिसार या आजारास दुजोरा दिला आहे. अनेक डॉक्टरांनी सांगितले की, आमच्याकडे सध्या 80 ते 90 टक्के रुग्ण हे पोटदुखी व अतिसार या या आजारानेच त्रस्त असलेल्या दिसत आहेत. सध्या कोरोनाचीही मोठी साथ सुरू आहे. त्यामुळे कोरोनाबरोबरच या पोटदुखी व अतिसार या आजारांपासून दूर राहण्यासाठी दररोज उत्तम प्रतिकारशक्ती वाढवणारा साधा व दर्जेदार आहार घेणे, उकळलेले पाणी भरपूर पिणे, फळभाज्या पालेभाज्या निर्जंतुक करून घेणे, घरातील सर्व लहान मोठ्या वस्तूंसह घरामध्ये स्वच्छता ठेवणे, बाहेरचे खाणे टाळणे, योग्य व्यायाम व योगासने करून आजारापासून दूर रहावे, असे मार्गदर्शन करत आहोत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com