esakal | कोरोनाचा आकडा वाढतोय; पुणे जिल्ह्यातील 'हा' तालुका डबल सेंच्युरीच्या उंबरठ्यावर!
sakal

बोलून बातमी शोधा

Corona-Patients

25 जून ते 4 जुलै या नऊ दिवसांच्या कालावधीत तालुक्यात तब्बल 126 रुग्णांची वाढ झाली आहे.

कोरोनाचा आकडा वाढतोय; पुणे जिल्ह्यातील 'हा' तालुका डबल सेंच्युरीच्या उंबरठ्यावर!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कडूस (पुणे) : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या बाबतीत खेड तालुका डबल सेंच्युरीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. शनिवारी (ता.4) एकाच दिवसात तालुक्यात उच्चांकी 29 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तसेच गेल्या नऊ दिवसांपासून तब्बल 126 रुग्ण सापडल्याने आजअखेर तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्हचा आकडा 184 वर पोहोचला आहे.

- आता बास झालं! विनाकारण फिरणाऱ्या पुणेकरांवर पोलिसांनी उगारला कारवाईचा बडगा

खेड तालुक्यात गेल्या आठवड्यापासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वेगाने वाढ होऊ लागली आहे. 25 जूनपर्यंत तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 58 होती. परंतु त्या दिवसानंतर पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याच्या बाबतीत तालुक्याने टॉप गियर टाकला आहे. 25 जून ते 4 जुलै या नऊ दिवसांच्या कालावधीत तालुक्यात तब्बल 126 रुग्णांची वाढ झाली आहे.

- राज्यातील 'या' भागात पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्यानं दिला इशारा!

आजअखेर तालुक्यात 184 रुग्ण झाले आहेत. त्यापैकी 64 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर दवाखान्यात 115 रुग्ण उपचार घेत आहेत. पाच रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसात तालुक्यात वाढलेली ही रुग्ण संख्या धोक्याची घंटा ठरत आहे. धोका घराच्या उंबरठ्यावर असताना नागरिकांचा अजूनही रस्त्यावर स्वैर वावर दिसत आहे. अजूनही हवी तेवढी काळजी घेताना नागरिक दिसत नाही.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पंचायत समिती इमारत, बँका, बाजार, किराणा आणि कापड दुकाने आदी ठिकाणी नागरिकांची वर्दळ वाढली आहे. रस्त्यावर विनाकारण फिरणारे नागरिक आढळत आहे. नागरिकांचा बिनधास्त वावर धोकादायक ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे ही वर्दळ नियंत्रणात आणण्याची गरज निर्माण झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

loading image