लसीचा दुसरा डोस आणि किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाचे प्रमाण वाढवा - अजित पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination
लसीचा दुसरा डोस आणि किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाचे प्रमाण वाढवा - अजित पवार

लसीचा दुसरा डोस आणि किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाचे प्रमाण वाढवा - अजित पवार

पुणे - पुणे शहर, (Pune City) पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना संसर्गाच्या (Corona Infection) प्रतिबंधासाठी कोरोना लसीच्या दुसऱ्या डोसचे (Vaccine Second Dose) आणि शहरातील किशोरवयीन मुलांच्या (Children) लसीकरणाचे प्रमाण वाढवा, असा आदेश पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शनिवारी (ता.५) विभागीय आयुक्त सौरभ राव यांना दिला. पुण्यातील किशोरवयीन मुलांच्या लसीकरणासाठी पुरेशी लस उपलब्ध होत नाही. त्यामुळे या लसीच्या उपलब्धतेसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू आणि लस उपलब्ध करून घेऊ, असे आश्‍वासनही त्यांनी यावेळी दिले.

जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या (१५ ते १७ वयोगट) कोरोना लसीकरणात जिल्ह्यातील ग्रामीण भागाने पहिल्यापासून मोठी आघाडी घेतली आहे. ग्रामीण भागातील लसीकरणासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे ८७ टक्के विद्यार्थ्यांना कोरोनाचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. मात्र ग्रामीण भागाच्या तुलनेत पुणे शहरातील विद्यार्थ्यांचे लसीकरण खुपच कमी प्रमाणात पूर्ण झाले आहे. त्यामुळे पहिल्यांदा पुण्यातील पात्र विद्यार्थ्यांच्या कोरोना लसीकरणाचा वेग वाढवा, या आदेशाचा पुनरुच्चारही पवार यांनी यावेळी केला. मागच्या आठवड्यातील शनिवारी (ता.२२) झालेल्या बैठकीतसुद्धा पवार यांनी हाच आदेश दिला होता.

हेही वाचा: सोमय्या हल्ला: मुद्दे संपले की,माणूस गुद्द्यांवर येतो- चंद्रकांत पाटील

पालकमंत्री पवार यांनी शनिवारी शहर व जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आढावा घेतला. या आढावा बैठकीत लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोरोना प्रतिबंधासाठी करावयाच्या संभाव्य उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करताना हा आदेश दिला. पवार म्हणाले, ‘जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या मागील बारा दिवसांपासून झपाट्याने कमी होत असली तरी, कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. हे मृत्यू का वाढत आहेत. याचा उलगडा अद्याप झालेला नाही. त्यामुळे शहर व जिल्ह्यातील जंबो कोविड सेंटर बंद करायचे की नाही, याबाबतचा निर्णय २८ फेब्रुवारीपर्यंतची परिस्थिती पाहून, त्यानंतर घेतला जाईल.’

विभागीय आयुक्त राव यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील कोरोना संसर्ग परिस्थितीची माहिती दिली. पुणे जिल्ह्यात मागील आठवड्याच्या तुलनेत सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या पन्नास टक्क्यांनी कमी झाली असल्याचे असल्याचे राव यांनी सांगितले.

Web Title: Increase Second Dose Of Vaccine And Immunization Of Childrens Ajit Pawar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top