पुण्यात भाजप कार्यालयाच्या परिसरात वाढवला पोलिस बंदोबस्त, कारण... 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 19 August 2020

जंगली महाराज रस्ता परिसरात भाजपचे शहर कार्यालय आहे. मंगळवारी दुपारी कार्यालयाच्या परिसरात नेहमीचा तुलनेत जादा पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला. याबाबत पक्षाच्या कार्यालयातील पदाधिकाऱ्यांनी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांना माहिती दिली.

पुणे : भारतीय जनता पक्षाच्या जंगली महाराज रस्त्यावरील कार्यालयाच्या परिसरात मंगळवारी अचानक बंदोबस्त वाढविण्यात आला. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभुमीवरच हा बंदोबस्त असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

जंगली महाराज रस्ता परिसरात भाजपचे शहर कार्यालय आहे. मंगळवारी दुपारी कार्यालयाच्या परिसरात नेहमीचा तुलनेत जादा पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला. याबाबत पक्षाच्या कार्यालयातील पदाधिकाऱ्यांनी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांना माहिती दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बाबत मुळीक म्हणाले, "ऐरवी पोलिस बंदोबस्त असतो, मात्र मंगळवारी जास्त पोलिस होते. त्याविषयी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. तेव्हा त्यांनीही गणेशोत्सवाचेच कारण सांगितले, ठोस कारण सांगितले नाही,'' तर भाजप कार्यालयास पोलिस बंदोबस्त वाढविण्यामागे कोणतेही महत्वाचे कारण नाही. केवळ गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभुमीवर हा बंदोबस्त देण्यात आला असल्याचे पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी स्पष्ट केले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increased police security in BJP office premises in Pune