हवेलीत वाढला कोरोनाचा धोका, या छोट्या गावातील रुग्णांचा आकडा पोचला... 

जनार्दन दांडगे
मंगळवार, 30 जून 2020

मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांवर सोमवारी (ता. २९) कारवाई केली असली, तरी अद्यापही अनेक नागरीक मास्कशिवाय घऱाबाहेर पडत आहेत. 

उरुळी कांचन (पुणे) : हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी येथे एक बत्तीस वर्षीय कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. कुंजीरवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या हद्दीत मागिल सात दिवसाच्या कालावधीत आढळून आलेला कोरोनाचा तो विसावा रुग्ण आहे. 

पुणे : लग्न समारंभांना होतीये गर्दी; शासनाच्या निर्णयाला केराची टोपली...

कुंजीरवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या हद्दीतील थेऊर, कुंजीरवाडी या दोन ग्रामपंचायत हद्दीत कोरोना रुग्न वाढीचे प्रमाण इतर गावांच्या तुलनेत अधिक आहे. कुंजीरवाडी या छोट्या गावात कोरोनाचे तब्बल दहा रुग्न अॅक्टीव्ह असून, थेऊर गावातही सात रुग्ण उपचार घेत आहेत. मागिल सात दिवसातील रुग्णांच्या संख्येचा विचार करता थेऊर व कुंजीरवाडी ही दोन्ही कोरोना वाढीच्या बाबतीत रेडझोनमध्ये गेली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

याबाबत कुंजीरवाडी आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. मेहबुब लकडे यांनी माहिती दिली की, कुंजीरवाडी गावठाणातील एका रुग्णाच्या जादा संपर्कात असल्याने बत्तीस वर्षाय तरुणाचे स्वॅब (घशातील द्रव) तपासणीसाठी सोमवारी पाठवला होता. त्याचा अहवाल नुकताच आला. त्यात तरुण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्याच्या संपर्कात आलेला त्याचे अठरा महिन्यांचे बाळ, पत्नी व आई यांना तत्काळ होम क्वारंटाइन केले असून, तिघांचेही स्वॅब बुधवारी (ता. १) सकाळी तपासणीसाठी पुण्यातील शासकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत. 

पंढरपूरच्या विठ्ठलाची भक्ती आणि नियोजनबद्ध धावपळ; वाचा तुम्हाला माहिती नसलेल्या सुप्रिया सुळे

कुंजीरवाडीत कोरोनाचे दहा रुग्ण
कुंजीरवाडीसारख्या छोट्या गावात मागिल सात दिवसात कोरोनाचे तब्बल दहा रुग्ण आढळून आले आहेत. तर कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या हद्दीतील रुग्नांचा आकडा वीसवर पोचला आहे. यात थेऊऱ येथे सात, सोरतापवाडीत एक, आळंदी म्हातोबाची येथे दोन रुग्णांचा समावेश आहे. मात्र, तरीही या गावांत कोरोनापासून दुर राहण्यासाठी कसलीही काळजी घेत नसल्याचे आढळून आले आहे. कुंजीरवाडीच्या सरपंच सुनिता धुमाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांवर सोमवारी (ता. २९) कारवाई केली असली, तरी अद्यापही अनेक नागरीक मास्कशिवाय घऱाबाहेर पडत आहेत. 

उरुळी कांचनमध्येही आणखी रुग्ण
उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील डाळिंब रस्ता परीसरात एक बत्तीस वर्षीय तरुण कोरोनाबाधित असल्याचे मंगळवारी दुपारी आढळून आले आहे. त्यामुळे मागिल सहा दिवसातील उरुळी कांचन शहरातील रुग्णांची संख्या पाचवर पोचली आहे. मंगळवारी दुपारी आढळुन आलेला कोरोनाबाधित रुग्ण हा सासवड येथील एका खासगी बॅंकेचा कर्मचारी आहे. त्यास सोमवारी कोरोनाचे लक्षणे आढळून आली. त्यामुळे त्यास लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increased risk of corona in Haveli taluka