Pregnant Women : गर्भवतींना मानसिक तणावाचा वाढता धोका

अलीकडे वाढत्या कामाच्या ताणामुळे मानसिक आरोग्याच्या तक्रारीतही वाढ होत आहेत. ही समस्या सामान्यापूर्ती मर्यादित न राहता गर्भवती महिलांमध्येही वाढू लागल्याचे आढळते.
pregnant women
pregnant womensakal
Summary

अलीकडे वाढत्या कामाच्या ताणामुळे मानसिक आरोग्याच्या तक्रारीतही वाढ होत आहेत. ही समस्या सामान्यापूर्ती मर्यादित न राहता गर्भवती महिलांमध्येही वाढू लागल्याचे आढळते.

पुणे - अलीकडे वाढत्या कामाच्या ताणामुळे मानसिक आरोग्याच्या तक्रारीतही वाढ होत आहेत. ही समस्या सामान्यापूर्ती मर्यादित न राहता गर्भवती महिलांमध्येही वाढू लागल्याचे आढळते. त्यात गर्भवती महिलांना प्रसूतिपूर्व आणि प्रसूतीनंतर येणाऱ्या नैराश्‍याच्या समस्या नुकत्याच एका अभ्यासातून समोर आल्या.

अनेक महिलांना प्रसूतीनंतर मानसिक ताणाची (पीपीडी) समस्या वाढत आहे. याचा परिणाम शारीरिक आरोग्यासह पोटातील बाळाच्या आरोग्यावरही होतो. अनेकदा या समस्या मानसिक आरोग्याशी निगडित असल्याचे अनेक गर्भवती महिलांना समजत नाही. दरम्यान ही समस्या कशी आणि कोणत्या कारणामुळे उद्भवू शकते हे जाणून घेण्यासाठी विविध देशातील गर्भवती महिलांसाठी प्रश्‍नावली तयार करून अभ्यास करत त्यावरील शोधनिबंधाची माहिती नुकतीच ‘नेचर’ या शोधपत्रिकेत प्रकाशित झाली. ‘गर्भवती महिलांच्या मानसिक आरोग्याला समजण्यासाठी प्रश्‍नावलीच्या आधारे मॉडेल रचना’ असे या शोधनिबंधाचे नाव आहे. त्यात महिलांना जाणवणारे नैराश्‍य, ताणाला केंद्रित करण्यात आले.

काय आहे महाराष्ट्रातील स्थिती?

गर्भावस्थेत अनेक स्त्रियांना विविध कारणांमुळे मानसिक ताण जाणवतो. तर महाराष्ट्रातील ग्रामीण भागात अनेक गर्भवती स्त्रियांना त्यांच्या कुटुंबीयांमुळे किंवा इतर कारणांमुळे मुलगाच जन्माला यावा याचा ताण सर्वाधिक जाणवतो.

पीपीडी (प्रसूतीनंतर मानसिक ताण) काय आहे?

  • पीपीडी हा बाळाच्या जन्मानंतर पाहायला मिळतो.

  • हार्मोन्स आणि शारीरिक बदल, मानसिक ताणाचा वैयक्तिक अथवा कौटुंबिक इतिहास

  • जन्मलेल्या बाळाची काळजी घेण्याचा ताण

हे लक्षात ठेवा

  • गर्भधारणेनंतर आरोग्याची योग्य काळजी घ्या

  • स्वतःला जास्तीत जास्त आनंदी ठेवा

  • रोज व्‍यायाम किंवा योग, ध्यान-साधना करा

  • ‘टॉकिंग थेरपी’सह अनेक प्रकारची मदत घ्या

या बाबी आवश्‍यक

  • नैराश्य किंवा मानसिक ताणावावर उपचार शक्य

  • पीपीडीसारखी समस्या उद्भवल्यास त्यात तुमची चूक नाही हे पटवणे गरजेचे

  • तुम्ही वाईट पालक आहात अशी भावना मनात आणू नये

  • योग्य समुपदेशन, आवश्‍यकता भासल्यास औषधे घ्या

लक्षणे

  • नैराश्‍यामुळे दुःखाची भावना

  • कमी ऊर्जा किंवा थकवा

  • चिंता, रडणे, चिडचिडेपणा

  • झोप, खाण्याच्या सवयीत बदल

मानसिक समस्येची प्रमुख कारणे

  • कामाचा ताण

  • वैवाहिक स्थिती

  • पतीचा आधार

  • छोटे कुटुंब

  • बाळाच्या संगोपनाची चिंता

  • पॅसिव्ह स्मोकिंग, मद्यपान, इतर व्यसने

  • पूर्वीपासून मानसिक आरोग्याची समस्या

अलीकडे ‘न्यूक्लिअर फॅमिली’ हा प्रकार वाढला आहे. त्यामुळे गर्भवती स्त्रियांना बहुतांशवेळी एकटेपणा जाणवतो. त्यामुळे बाळाच्या जन्मानंतर त्याची काळजी घेण्यापासून ते सांभाळण्यासाठीची मदत अशा अनेक गोष्टींची चिंता वाढते. हीच चिंता नंतर मानसिक ताणात बदलू शकते. त्यामुळे गर्भावस्थेत असल्यावर रोज व्यायाम करणे, सकारात्मक विचार करणे आवश्‍यक आहे. तसेच प्रसूतीनंतर या महिलांना त्‍यांच्या कुटुंबातील मोठ्या सदस्यांनी अथवा नातेवाइकांनी मानसिकरित्या समाधान देणे गरजेचे आहे.

- डॉ. मीनाक्षी देशपांडे, स्त्रीरोगतज्ञ व अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे शाखा

पीपीडीची ही समस्या साधारणपणे बाळाच्या जन्मानंतर एक आठवडे, एक महिना किंवा त्याहून जास्त काळ असू शकते. यासाठी अशा महिलांना वेळेत समुपदेशन आणि गरज भासल्यास त्यांना औषधेही दिली जातात. मानसिक ताणाची समस्या जर गर्भावस्थेत जाणवली तर डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार औषधे किंवा समुपदेशन, ध्यान-धारणा, योगाच्या माध्यमातून बरे होणे शक्य आहे

- डॉ. ज्योती शेट्टी, प्रमुख, मानसोपचार विभाग, भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com