झाडावरून पडलेला चित्रबलाक पाहून वकिलांनी... 

डाॅ. संदेश शहा
Tuesday, 9 June 2020

इंदापूर न्यायालयाच्या प्रांगणात ८ जून रोजी सायंकाळी जुन्या चिंचेच्या झाडावरून पडलेल्या चित्रबलाक पक्ष्यास कर्मचारी व वकिलांमुळे जीवदान मिळाले.

इंदापूर (पुणे) : इंदापूर न्यायालयाच्या प्रांगणात ८ जून रोजी सायंकाळी जुन्या चिंचेच्या झाडावरून पडलेल्या चित्रबलाक पक्ष्यास कर्मचारी व वकिलांमुळे जीवदान मिळाले.

केरळच्या त्या हत्तीणीला पुण्याच्या या हरिणीचा हेवा वाटत असेल...

इंदापूर न्यायालयाच्या (जुने तहसील कार्यालय) प्रांगणातील जुन्या चिंचेच्या झाडावर गेल्या पाच दशकापासून सैबेरिअन चित्रबलाक पक्षी आपले गोकुळ फुलवण्यासाठी येतात. त्यांच्या युवापिढीच्या आकाशातील सुंदर कवायती पाहण्यासाठी अनेक पक्षीप्रेमी इंदापूर येथे येतात. मात्र, अनेकदा झाडावर तोल सावरताना पक्षी जखमी होऊन खाली पडतात. असाच एक चित्रबलाक पक्षी झाडावरून पडून जखमी झाला. 

पुण्यात यायचंय? क्वारंटाइनसंदर्भात आहे मह्त्त्वाची बातमी

याबाबतची माहिती इंदापूर न्यायालयाचे बेलीफ प्रविण पोतदार, शिपाई विलास म्हस्के यांनी वकिल संघटनेचे उपाध्यक्ष ऍड. अशफाक  सय्यद यांना दिली. त्यांनी वनविभागाचे कर्मचारी संतोष गीते यांना बोलावून घेतले. त्यांनी जखमी चित्रबलाक पक्ष्यावर तातडीने प्रथमोपचार केले. त्यामुळे त्यास जीवदान मिळाले.

बारामतीत पार्टीसाठी हरणाची शिकार

इंदापूर न्यायालयाचे सहदिवाणी न्यायाधीश एन. पी. देशपांडे, न्यायालयीन अधीक्षक राजाभाऊ लिंबोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षी वनखात्याच्या ताब्यात देण्यात आला. या वेळी ऍड. विकास देवकर, ऍड. संदीपान भोसले, न्यायालयीन कर्मचारी फिरोज पठाण, बिपीन वाघमारे, सुरेश डहाळे, सिराज सय्यद, शिपाई बाळासाहेब पवार आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indapur- The Chitrabalak bird that fell from the tree was saved by the lawyers