

Dream Home for Many: 534 Housing Units Underway in Indapur
sakal
इंदापूर : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत इंदापूर नगर परिषदेकडून शहराच्या प्रदूषणमुक्त व निसर्गरम्य परिसरात ५३४ घरांचा गृहप्रकल्प साकारण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे अगदी कमी किमतीत सर्वसामान्यांना घर उपलब्ध होणार असल्याने इंदापूरमध्ये स्वतःचे घर असावे, अशी इच्छा बाळगणाऱ्यांचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे.