Indapur Election Result 2021 : भिगवणमध्ये सत्ताधाऱ्यांना धक्का; श्रीनाथ ग्रामविकास पॅनेलची मुसंडी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 January 2021

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सोमवारी सकाळी दहा वाजता सुरुवात झाली.

-  भिगवण, : येथील भिगवण ग्रामपंचायती निवडणुकीमध्ये स्व. रमेशराव जाधव प्रेरित श्रीनाथ ग्रामविकास पॅनेलने सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या भैरवनाथ पॅनेलचा धु्व्वा उडवुन १७ जागांपैकी १६ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व गाजविले आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने मागील पाच वर्षामध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसने येथील ग्रामपंचायतीमध्ये मांडलेला संगित खुर्चींचा खेळ त्यांच्या चांगलाच अंगलट आल्याचे दिसुन आले आहे. येथील निवडणुक ही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये होती त्यामध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बाजी मारल्याचे स्पष्ट होत आहे.

 

पिंपरी बुद्रुक ( ता इंदापूर ) : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सोमवारी सकाळी दहा वाजता सुरुवात झाली. मतमोजणी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी होत असून, अंतिम निकाल दुपारी तीन ते चार वाजेपर्यंत जाहीर होतील, असा अंदाज आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या चार हजार 904 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 11 लाख 18 हजार 104 मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला होता. जिल्ह्यात मतदान 80.54 टक्‍के झालेले आहे. जिल्ह्यातील उर्वरित 95 ग्रामपंचायतींच्या निवडणुका यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. 

हेही वाचा - Pune Gram Panchyat Election Result Live Updates गावचा कारभारी कोण? दुपारपर्यंत चित्र होणार स्पष्ट

अपडेट्स -

- पहिल्या 37 ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसची जोरदार मुसंडी, पहिल्या फेरीत निमगाव केतकी, काटी तसेच पश्चिम भागात सर्वत्र राष्ट्रवादीची निर्णायक आघाडी

- ग्रामपंचायत निवडणूकीत विजयी उमेदवार पूढील प्रमाणे -

वार्ड क्रमांक १) ज्योती श्रीकांत बोडके, भाग्यश्री सुदर्शन बोडके, विद्यादेवी आबासाहेब बोडके

वार्ड क्रमांक २) पांडुरंग हंबिरराव बोडके, अनुराधा बाबासाहेब गायकवाड, सुनिता दत्तात्रय शेंडगे

वार्ड क्रमांक ३) संतोष हरिभाऊ सुतार, अनिल मशिकांत पाटील, हलीमा साहेबलाल शेख.

राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पिरसाहेब ग्रामविकास पॅनल सात तर भाजप पुरस्कृत पिरसाहेब विकास पॅनलला दोन जागावर समाधान मानावे लागले.  मात्र तिसऱ्या आघाडीला खातेही खोलता आले नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indapur Election Result 2021 pune gram panchyat election result 2021