Indapur: शरद पवारांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्यानिमित्त मोफत शिवभोजन थाळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांनी चाखली शिवभोजन थाळीची चव.

शरद पवारांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्यानिमित्त मोफत शिवभोजन थाळी

इंदापूर : राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्या निमित्त इंदापूर युवा क्रांती प्रतिष्ठान व सृजन नागरी संघर्ष समिती प्रभाग क्रमांक १ च्या वतीने इंदापूर बसस्थानक रचनासंकुल प्रांगणात आयोजित शिवभोजनथाळी दहा दिवस कार्यक्रमाचा समारोप राज्याचे सामान्य प्रशासन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते झाला. यावेळी मंत्री भरणे यांनी स्वतः शिवभोजन थाळीची चव चाखत जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सचिन सपकळ, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांना देखील थाळीचा आस्वाद देत चव चांगली असल्याचा निर्वाळा दिला.

यावेळी राज्य मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, आमचे नेते शरद पवार हे देशाचे नेते असून त्यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल ऋणी रहाण्यासाठी प्रशांत सिताप व सहकाऱ्यांनी गरिबांना पोटभर भोजन देण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे.

हेही वाचा: बारामतीच्या पोलिस निरिक्षकांची तडकाफडकी बदली

यावेळी युवाक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापकअध्यक्ष प्रशांत सिताप म्हणाले, उपक्रमाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते करण्यात आला. श्री. पवार यांचे कार्य पुरोगामी असून त्यामुळे अनेकांना सत्ता मिळाली. त्यांच्या आम्ही सर्वजण त्यांच्या ऋणात राहू इच्छितो.

यावेळी बाळासाहेब ढवळे, धरमचंद लोढा, सचिन परबते, विकास खिलारे,सुधिर मखरे ,अस्लम शेख, पियुष बोरा, ऊमेश राऊत, मुकुंद साळुंखे, सचिन व्हावळ, महादेव लोखंडे उपस्थित होते.

Web Title: Indapur Free Shivbhojan Plate Sharad Pawar Festival

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Sharad PawarPune News
go to top