esakal | Indapur : इंदापूर शिक्षक पतसंस्थेची स्वभांडवलाकडे वाटचाल
sakal

बोलून बातमी शोधा

indapur

Indapur : इंदापूर शिक्षक पतसंस्थेची स्वभांडवलाकडे वाटचाल

sakal_logo
By
डाॅ. संदेश शहा

इंदापूर : इंदापूर शिक्षक पतसंस्थेने कर्ज लाभांश वाटप ९.२५ टक्के उच्चांकी दराने केलेअसून कायम ठेवीवर १०% व्याज देणारी ही एकमेव संस्था आहे.पतसंस्थेचे गाळे व कार्यालयाचे २.६० कोटीचे बांधकाम सभासदांकडून एक रुपयाही न घेता करुन सभासदांना १.२५ कोटींचा परतावा लाभांश रुपाने दिलाआहे. पतसंस्थेची वाटचाल स्वभांडवलाकडे असून त्यामुळे संस्था कारभाराबद्दल सभासद खूष आहेत असे प्रतिपादन पतसंसंस्थेचे सभापती ज्ञानदेव चव्हाण यांनी केले.

इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची ९८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा लोकशाही पद्धतीने सभापती ज्ञानदेव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आॕनलाईन झाली.श्री. चव्हाण पुढे म्हणाले, पतसंस्थेचे भाग भांडवल १९,२६,१८,८४६/- रुपये असून कर्जवाटप ६,९५,९३,७८२/- रुपये करण्यात आले असून लेखापरीक्षण अ वर्ग आहे.

हेही वाचा: पुणे: हिंडवडीत एक लाखाचे सोन्याचे ब्रेसलेट लंपास

संचालकमंडळाने पारदर्शी व काटकसरीने कारभार करत १५ कोटी रुपयांचा ठेवींचा टप्पा पुर्ण केलाआहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती बॕकेकडून ३३ कोटी रुपये १०.५०% व्याजाने घेवून सभासदांना ९% दराने २० लाख रुपये कर्ज दिले जाते .शिक्षक कल्याण निधीतून मयत सभासद वारसांना १६ लाख रुपये आर्थिक मदत केली जाते. गंभीर आजाराच्या उपचारासाठीतात्काळ ५० हजार रुपये दिले जातात. डिसीपीएस धारक शिक्षकांना वाढीव निधी दिला जातो.

विषय पञिका वाचन सचिव संजय लोहार यांनी करून सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली.यावेळी पतसंस्थेचे माजी सभापती तथा संचालक ज्ञानदेव बागल ,सुनिल वाघ, हरिश काळेल,विलास शिंदे, संभाजी काळे,किरण म्हेञे,नितिन वाघमोडे, सुनंदा बोके, सुभाष भिटे, हनुमंत दराडे, सुनिल चव्हाण, गणेश सोलनकर, आदिनाथ धायगुडे, बालाजी कलवले, दत्तात्रय ठोंबरे, नानासाहेब नरुटे, नानासाहेब दराडे, सुरेश भोंग, मनिषा मोटे, रुपाली कदम उपस्थित होते. आभार उपसभापती वसंत फलफले यांनी मानले.

loading image
go to top