esakal | पुणे: हिंडवडीत एक लाखाचे सोन्याचे ब्रेसलेट लंपास
sakal

बोलून बातमी शोधा

crime

पुणे: हिंडवडीत एक लाखाचे सोन्याचे ब्रेसलेट लंपास

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे: हॉटेलमध्ये थांबलेल्या एका तरुणाच्या खोलीतून अज्ञात चोरट्याने एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे ब्रेसलेट लंपास केले. ही घटना हिंजवडीतील साखरेवस्ती येथे घडली. याप्रकरणी अक्षय प्रमोद बाफना (रा. कसबापेठ, पुणे) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा: Pune : मंगळवारी लसीकरण केंद्रावर कोव्हीशील्डचे २५० डोस

त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे शुक्रवारी (ता. ३) साखरेवस्ती येथील फॅकशिफ हॉटेलमध्ये थांबले होते. दरम्यान, अज्ञात चोरटा दरवाजाची कडी उघडून त्यांच्या रूममध्ये शिरला. बॅगेत ठेवलेले एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे ब्रेसलेट चोरून नेले. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

loading image
go to top