

Boosting Rural Economy and Jobs through Fisheries Research
Sakal
इंदापूर : उजनी धरणाचे क्षेत्र तसेच निरा आणि भीमा नदीचा लाभलेला किनारा यामुळे मत्स्य उद्योगाला असलेली संधी ओळखून राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुका मत्स्य संशोधन आणि प्रशिक्षणाचे राज्यस्तरीय केंद्र बनण्याच्या दिशेने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून इंदापूरमध्ये राज्यातील पहिले प्रगत मत्स्य महाविद्यालय सुरू करण्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात बैठक संपन्न झाली. या महाविद्यालयामुळे केवळ शैक्षणिक लाभ नव्हे, तर स्थानिक अर्थव्यवस्थेला गती आणि तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.