esakal | मुंबई-पुण्यातील लोकं इंदापुरात येत असल्याने तिथं...
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई-पुण्यातील लोकं इंदापुरात येत असल्याने तिथं...

- चाकरमान्यांनी काढता पाय घेत गावाकडे मोर्चा वळविल्यामुळे गावाकडची चिंता वाढली.

मुंबई-पुण्यातील लोकं इंदापुरात येत असल्याने तिथं...

sakal_logo
By
प्रा. प्रशांत चवरे

भिगवण : मुंबई व पुण्यामध्ये कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे तेथील चाकरमान्यांनी काढता पाय घेत गावाकडे मोर्चा वळविल्यामुळे गावाकडची चिंता वाढली आहे. इंदापूर तालुक्यामध्ये भिगवण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये मागील आठवड्यामध्ये मुंबई व पुण्याहून सुमारे २११ व्यक्ती आल्या आहेत तर आणखीही ओघ सुरुच असल्यामुळे सध्या या भागामध्ये कोरोनाचा धोका वाढला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इंदापूर तालुक्यातील पहिला कोरोना रुग्ण भिगवण स्टेशन येथे आढळला होता. सदर रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर व संपर्कातील ४४ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे भिगवण परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. तिसरा लॉकडाऊन संपल्यानंतर या भागातील दुकाने, व्यवसाय व काही कंपन्याही सुरु झाल्यामुळे लोकांना दिलासा मिळाला होता. परंतु, लॉकडाऊन तीननंतर मिळालेल्या शिथिलतेचा फायदा घेत पुणे व मुंबई येथे नोकरीनिमित्त असलेले नागरिक इंदापूर तालुक्यामध्ये परंतु लागल्यामुळे इंदापूर तालुक्याचा धोका पुन्हा वाढला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मुंबई पुण्याहून इंदापूर तालुक्यामध्ये आलेल्या चार जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. येथील भिगवण पोलिस ठाण्याच्या ह्द्दीमध्ये मागील भिगवण, तक्रारवाडी, मदनवाडी, डिकसळ, भादलवाडी, पोंधवडी, शेटफळगढे आदी गावामध्ये मागील आठवड्यामध्ये सुमारे २११ नागरिक मुंबई पुण्याहून परतले आहे. यापैकी काही नागरिक हे रितसर परवानगी घेऊन आले आहे. तर काही मात्र विनापरवानाच गावात घुसल्यामुळे धोका वाढला आहे. तसेच पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक वाढल्यामुळे पुणे व मुंबईहून आलेल्या तरकारी व इतर वाहनचालकांमुळे धोका निर्माण झाला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोंधवडी (ता.इंदापुर) गावांमध्ये विनापरवाना आलेल्या व प्रशासनास माहिती न दिलेल्या निखील रामानंद जगताप व उज्वला निखिल जगताप यांच्याविरुध्द भिगवण पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने म्हणाले, मंबई किंवा पुण्याहून बाहेर पडताना प्रशासनाची रितसर परवानगी घेणे आवश्यक आहे व मुळगावी आल्यानंतर सरपंच, पोलिस पाटील किंवा प्रशासनास माहिती देणे आवश्यक आहे. विना परवाना आल्यास व माहिती दडविल्यास सबंधितावंर गुन्हे दाखल करण्यात येतील.

loading image
go to top