esakal | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इंदापुरात पोलिसांचे पथसंचलन
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इंदापुरात पोलिसांचे पथसंचलन

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इंदापुरात पोलिसांचे पथसंचलन

sakal_logo
By
संदेश शहा

इंदापूर : इंदापूर पोलीस (indapur police) ठाण्याचे पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर पोलीसांनी इंदापूर शहर, निमगाव केतकी व बावडा येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पथ संचलन केले. या पथसंचलनात सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, ज्ञानेश्वर धनवे, महेश माने, पवन भोईटे यांच्यासह पोलीस, होमगार्ड सहभागी झाले होते.

यानिमित्त पोलीस निरीक्षक श्री. मुजावर म्हणाले, इंदापूर पोलीस ठाण्याअंतर्गत इंदापूरशहर व ग्रामीणमध्ये ५० हून जास्त गणेशो त्सव मंडळे आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने मिरवणुकीस बंदीघातली आहे. शासनाने सोशल गॅदरिंगला परवानगी दिली नाही. त्यामुळे या उत्सवाचे पावित्र्य जपण्याचे काम गणेश मंडळाचे आहे.

हेही वाचा: ममतांविरोधात मैदानात उतरलेल्या प्रियंका म्हणतात; 'ममतांना...'

त्यामुळे मंडळांनी योग्य दक्षता घेणे गरजेचे आहे. जी मंडळे कायदा व सुव्यवस्थेचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. पोलीस ठाण्याअंतर्गत गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांची वर्गवारी करण्यात आली असून त्यांच्यावर पोलीसांचे लक्षआहे. त्यांनी गुन्हे केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे सूतोवाच त्यांनी केले.

loading image
go to top