
इंदापूर पोलिसांनी ३२ लाख ६६ हजार ८० रुपयांचा गुटखा जप्त केला
इंदापूर :(pune news) पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर(Pune Solapur National Highway) सरडेवाडी ( ता. इंदापूर ) टोलनाक्यावर पोलिसांच्या नाकाबंदीस न जुमानता भरधाव वेगात निघून चाललेल्या चारचाकी वाहनाचा पाठलाग करुन इंदापूर पोलिसांनी २० लाख ६६ हजार ८० रुपयांचा वेगवेगळ्या कंपनीचा गुटखा तसेच गुन्ह्यात वापरलेले १२ लाख रुपयांचे वाहन असा एकूण ३२ लाख ६६ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.दि.२२ डिसेंबर रोजी रात्री एक वाजता पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही धडक कारवाई केली. (Indapur police seize gutka worth 32 lakh 66 thousand 80 rupees)
हेही वाचा: स्वच्छतेत अव्वल; कचरा प्रश्न जैसे थे!
पोलीस नाईक मनोज गायकवाड यांच्या फिर्यादी वरून इंदापूर पोलिसांनी वाहनचालक गणेश आबासाहेब चव्हाण ( वय २५, रा. शेटफळ ता.मोहोळ.जि सोलापूर) व वाहन मालक चंद्रकांत क्षीरसागर ( रा. बारामती, जि.पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पैकी चव्हाण यास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर,फौजदार दाजी देठे,पोलीस नाईक मनोज गायकवाड ,पोलीस शिपाई निलेश फडणीस हे सरडे वाडी टोलनाक्याजवळ नाकाबंदी करून वाहन तपासणी करत असताना गुन्हयातील वाहनास थांबण्याचा इशारा केला असता वाहन थांबले नाही.(While inspecting vehicles by blocking near Sarde Wadi toll plaza)
हेही वाचा: मुळशीतील सात ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर
त्यामुळे पोलिसांनी पाठलाग करून महामार्गावर देशपांडे हॉटेल जवळ वाहनास थांबवून ही कारवाई केली. या कारवाईत ४ लाख ८९ हजार ६०० रुपयांची माणिकचंद गुटख्याची प्रक्रिया केलेली सुपारी व २ लाख ४ हजार रुपयांची सुगंधी तंबाखू, २ लाख १६ हजार रुपयांची विमल गुटख्याची प्रक्रिया केलेली सुपारी, २ लाख ६९ हजार २८० रुपयांची सुगंधी तंबाखू,१० लाख २१ हजार ६८० रुपयांचा पान मसाला व १२ लाख रुपयांचे वाहन जप्त करण्यात आले आहे.(action was taken by stopping the vehicle near Deshpande Hotel on the highway)
Web Title: Indapur Police Seize Gutka Worth 32 Lakh 66 Thousand 80 Rupees
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..