हनुमान कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी मगर
sakal

हनुमान कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी मगर

मुळशी तालुक्यात सात ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांची मतमोजणी पौड येथे शांततेत पार पडली

राहू, ता. २० : देवकरवाडी (ता. दौंड) येथील हनुमान विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी मच्छिंद्र तुकाराम मगर यांची तर उपाध्यक्षपदी पारूबाई मच्छिंद्र कुंजीर यांची बिनविरोध निवड झाली, अशी माहिती संस्थेचे सचिव सुरेशनाना नागवडे यांनी दिली.
या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत माजी आमदार रमेश थोरात समर्थक जय हनुमान सहकार पॅनेलने १३ पैकी ९ जागा मोठ्या फरकाने जिंकल्या. आमदार राहुल कुल समर्थक पॅनेलला चार जागेवर समाधान मानावे लागले.
गेल्या पंचवीस वर्षांपासून कुल समर्थक यांच्या ताब्यात असणारी सोसायटी थोरात समर्थकांनी खेचून आणली. निवडीनंतर थोरात समर्थकांनी जल्लोष केला. यावेळी सचिन देवकर, हरिभाऊ देवकर, दीपक जगताप, विकास देवकर, नितीन खळदे, आश्रू डुबे, शशिकांत माने, भास्कर देवकर, दीपक खळदे आदी उपस्थित होते.
यावेळी मगर म्हणाले, ‘‘भविष्यात सभासदांच्या दृष्टीनेच आधी महत्त्वाचे निर्णय घेऊन सभासदांचे हित जोपासण्यावर आमचा भर राहणार आहे.’’

हनुमान कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी मगर
स्वच्छतेत अव्वल; कचरा प्रश्न जैसे थे!

चांद्यात प्रतिक्षा मांडेकर (१२३) यांनी मयूरी मांडेकर (१२०) यांच्या विरोधात तीन मतांच्या फरकाने विजयश्री खेचून आणली. धामणओव्होळला संतोष शेडगे (६०) यांनी नवनाथ काळे (२९) यांना चीत केले. ताम्हीणीला अश्विनी कोकरे (११३) यांनी प्रियांका मोरे (६५) यांच्यावर विजय मिळविला. निव्याला भरत गाऊडसे (१५६) यांनी जयवंत चोरघे (९८) यांना पराभूत केले. वाळेणला गणेश मोढवे (५०) यांना पराभूत करत संजय साठे (१०६) यांनी विजय मिळविला.

हनुमान कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी मगर
महाविद्यालयीन तरुण-तरुणींमुळे भोरच्या नाना-नानी पार्कला कुलूप

तहसीलदार अभय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी पार पडली. यावेळी नायब तहसीलदार श्रीकांत मिसाळ, सहायक पोलिस निरीक्षक विनायक देवकर, पोलिस उपनिरीक्षक मृगदीप गायकवाड यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. विजयी उमेदवाराच्या नावांची घोषणा होताच समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला.(counting of votes conducted under the guidance of Tehsildar Abhay Chavan)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com