Pune Crime : पुण्यात संतापजनक घटना ! पोटच्या मुलांनीच वृद्ध आई-वडिलांना जमिनीसाठी भररस्त्यात दांडक्याने केली मारहाण, घटनेचा व्हिडिओ समोर

Land Dispute : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात जमिनीच्या वादातून वृद्ध आई-वडिलांना त्यांच्या दोन मुलांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी तुकाराम राऊत आणि पत्नी अंजना तरंगवाडी परिसरात फिरत असताना त्यांना कारमधून आलेल्या मुलांनी अडवले.
Allegation of assault on elderly parents over a land dispute in Indapur.

Allegation of assault on elderly parents over a land dispute in Indapur.

esakal

Updated on

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जमिनीच्या वादातून पोटच्या दोन मुलांनीच वृद्ध आई-वडिलांना रस्त्यात अडवून मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओही समोर आला असून, त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दोन्ही मुलांविरोधात इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com