esakal | इंदापूर: शेटफळ हवेली तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यात यावा- शिवसेना
sakal

बोलून बातमी शोधा

इंदापूर: शेटफळ हवेली तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यात यावा- शिवसेना

इंदापूर: शेटफळ हवेली तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यात यावा- शिवसेना

sakal_logo
By
डाॅ. संदेश शहा

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील ७ गावांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच १३ गावांची शेती सिंचन व्यवस्था अवलंबून असणाऱ्या शेटफळ हवेली येथील तलाव संपुर्ण क्षमतेने भरून घ्यावा अशी आग्रही मागणी इंदापूर तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. पुणेजल संपदा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर यांना शिवसेनेचे इंदापूर तालुका प्रमुख नितीन शिंदे, तालुका समन्वयक अरुण पवार, इंदापूर शहर प्रमुख महादेव सोमवंशी, शिवसेना हिंदुस्थान माथाडी कामगार संघटनेचे राजू शेवाळे यांनी लेखी निवेदन देवून ही मागणी केली आहे.

हेही वाचा: पुणे : विहीर खोदताना सापडलेली दशभुज चिंतामणी मूर्ती

यावेळी नितीन शिंदे म्हणाले, इंदापूर तालुक्यातील १३ गावचे हजारो शेतकरी व सात गावांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शेटफळ हवेली येथील ब्रिटिश कालीन तलावावर अवलंबून आहे. मात्र हा तलाव अपुरा पाऊस झाल्याने पूर्ण क्षमतेने भरला गेला नाही. भाटगरधरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर धरणातून वाहणारे पाणी या तलावात सोडून तलाव भरलाजातो. भाटगर धरण शंभर टक्के भरले असल्याने शेटफळ हवेली तलावात पाणी सोडल्यास उभ्या पिकांना जीवदान मिळेल व पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही.

यासंदर्भात कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर म्हणाले, सध्या चालू असलेले सिंचनआवर्तन संपल्यानंतर लवकरात लवकर शेटफळतलावा मध्ये पाणी सोडण्यास सुरुवात करण्यातयेणार आहे. मात्र शेटफळ तलाव लाभधारकांनी पाणीपट्टी भरून सहकार्य करावे असे त्यांनी आवाहन त्यांनी केले.

loading image
go to top