esakal | पुणे: विहीर खांदतांना सापडलेली दशभुज चिंतामणी मूर्ती
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे  : विहीर खोदताना सापडलेली दशभुज चिंतामणी मूर्ती

पुणे : विहीर खोदताना सापडलेली दशभुज चिंतामणी मूर्ती

sakal_logo
By
विश्वजीत पवार

पुणे: प्राचीन काळातील मूर्ती कपाळावर ओंकार, तीन दोळे, उज्वी सोंड, सोंडेवर रत्नकलश, उजव्या हातामधे मोदक, डाव्या हातात तुटलेला हाथ, आठ हातांमध्ये अनुक्रमे पाश, अंकुश, कमळ, गदा, तोमर, धान्याचे कणीस, त्रिशूळ आणि धनुष्य धारण केलेले व दगडाचा रंग तांबूस, उंची २ फूट सहसा भागात आढळून येत नसल्याने हेच मूर्तीचे वैशिष्टये मानले जाते. श्री खळदकर समर्थभक्त असल्याने त्यांनी देवाचे नाव श्रीसमर्थ वरद सिद्धिविनायक स्वयं नर्मदेश्वर दशभुज चिंतामणी निश्चित केले.

हेही वाचा: भारतीय वनस्पतीशास्त्र सर्वेक्षण विभागात 'ओझोन' दिन साजरा

शहराच्या दक्षिणेला पर्वतीच्या पायथ्याला तुळशीबागकरांची जमीन विक्रीस होती, त्यातील काही जागा दामोदर सीताराम खळदकर यांनी १९५० साली खरेदी केले व जागेची साफसफाईला सुरवात केले. दामोदरपंतांच्या पत्नी राधावाई खळदकर यांना स्वप्न साक्षात्कार दशभुज चिंतामणी प्रगट होणार असल्याचे जाणीव झाले. दमोदरपंत व चिरंजीव अरुण यांना श्रीदशभुज चिंतामणीचे दर्शन घडले.

१८८६ विहीर खोदकाम चालू असताना ९ ऑक्टोबर १९६४ रोजी सकाळी ११ चा सुमाऱ्यास ९ फूट खोलीवर चिंतामणीची मूर्ती सापडली व कुटुंबांनी मूर्तीची तात्पुरता स्थापना एक लहानशी घुमटी बांधून केली. मंदिराचे काम चालू असताना १७ नोव्हेंबर १९६४ रोजी श्रींची मूर्ती नाहीसे आढळून, आल्याने चोरीची तक्रार पोलिसांकडे दाखल केले. मूर्ती सापडेपर्यंत खळदकर यांनी अन्नग्रहण करण्याचा निश्चय केला.

चौथ्या दिवशी चिरंजीव अरुण यांना स्वप्नदृष्टांत झाला व चिंतामणीने सांगितले, ''मी जागेच्या दक्षिण बाजूला डोंगराच्या कडेला असलेल्या एका पडीक विहिरीमध्ये स्नानसाठी आलो आहे. तुमची निष्ठा व उपासना पाहून, प्रसन्न आहे. पाचव्या दिवशी मजसाठी बांधलेल्या मंदिरात स्थानापन्न होऊन सर्वांचे कल्याण करीन.''

मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यावर शके १८८६ मध्ये मार्गशिष महिन्यातील अंगारकी संकष्टी चतुर्थीला २-१२-१९६४ रोजी विधिपूर्वक मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. गणेश मूर्तीची प्रसिद्धी अल्पावधित सर्वत्र झाली

loading image
go to top