इंदापूर : रुग्णालयात मृतांचे अवशेष डुकरे खात असल्याचा प्रकार उघड |Indapur Sub Divisional Hospital | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indapur Sub Divisional Hospital

इंदापूर : रुग्णालयात मृतांचे अवशेष डुकरे खात असल्याचा प्रकार उघड

इंदापूर : इंदापूर उपजिल्हा रुग्णालय (Indapur Sub Divisional Hospital) आवारात शव-विच्छेदन गृहाशेजारी शवविच्छेदन (postmortem) करण्यात आलेल्या मृत व्यक्तीचे अवशेष उघड्यावर टाकण्यात आले असून सदर अवशेष डुकरे ,कुत्रे खात असल्याचा दुर्दैवी प्रकार दि.२७ डिसेंबर रोजी उघड झाला आहे. मृत अवशेषांची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य पद्धतीचा अवलंब करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात स्वतंत्र शव विच्छेदन गृह असून कायदेशीर बाबींसाठी लागणाऱ्या मयत व्यक्तीच्या शरीराचे अवशेष काढून ते विशिष्ट द्रवामध्ये प्लास्टिक भरणीत साठवून ते प्रयोगशाळेत पाठवले जातात व त्याचा एक नमुना इंदापूर येथे ठेवला जातो. काही कालावधीनंतर सदरचे अवशेष विशिष्ट पद्धतीने नष्ट केले जातात. मात्र इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात सदर अवशेष प्लास्टिक भरणीसह शवविच्छेदन गृहाशेजारी उघड्यावर जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र मांसाचे सर्व तुकडे न जळाल्याने त्यावर डुकरे व भटक्या कुत्र्यांनी ताव मारला आहे.

हेही वाचा: पुणे : पादचारी मार्गावर तब्बल ७८ लाखांचे शिल्प उभारणी सुरु

गणेश पवार (रा. अगोती नं.१ ता. इंदापूर ) यांच्यासमोरच हा प्रकार घडल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. साठवलेले अवशेष हे दोन ते तीन दिवसात पोलीस विभागाने आपल्या ताब्यात घ्यावयाचे असतात. त्यांना गरज नसेल तर पोलीस लेखी पत्र देतात. त्यानंतर त्याची विल्हेवाट लावली जाते मात्र त्याची प्रक्रिया माहित नाही. मात्र इंदापूर उपजिल्हा रुग्णालय आवारात तसा प्रकार घडला असेल तर ते चुकीचे आहे. मी त्याची माहिती घेतो अशी प्रतिक्रिया जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांनी दिली.

यासंदर्भात इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ.सुहास शेळके म्हणाले ,सदर प्रकार चुकीचा असून अवशेषांची विल्हेवाट लावा असे कोणतेही आदेश दिले नव्हते.

Web Title: Indapur Sub Divisional Hospital Death Body Part Pig

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune NewsIndapur
go to top