इंदापूरकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा; रक्तदानामध्ये तालुका राज्यात अव्वल

राजकुमार थोरात
रविवार, 28 जून 2020

महिलांचा ही रक्तदान शिबिरामध्ये सहभाग...

वालचंदनगर (पुणे) : लाॅकडाऊनच्या काळामध्ये इंदापूर तालुक्यातील दहा हजारापेक्षा अधिक नागरिकांनी रक्तदान केले आहे. त्यामुळे रक्तदानामध्ये इंदापूर तालुका राज्यात अव्वल ठरला आहे. जिल्ह्याच रक्तदानाचे टार्गेट एकट्या इंदापूर तालुक्याने पूर्ण केले असून महिलांनीही रक्तदान शिबिरामध्ये उत्सफुर्तपणे सहभाग घेतला असल्याची माहिती राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सणसर (ता. इंदापूर) येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन, रक्तदान शिबिर व अल्पदरात पिठाची चक्की, वॉटर फिल्टरच्या वितरण प्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. यावेळी छत्रपती सहकारी कारखान्याचे उपाध्यक्ष अमोल पाटील, संचालक अॅड रणजीत निंबाळकर, दीपक निंबाळकर, सणसरच्या सरपंच ललिता गायकवाड, उपसरपंच शोभा निंबाळकर, छत्रपती कारखान्याचे माजी संचालक विजयसिंह निंबाळकर, माजी उपसरपंच यजुवेंद्र निंबाळकर, अभयसिंह निंबाळकर, विक्रमसिंह निंबाळकर, यशवंत पाटील, सागर भोईटे, अमोल भोईटे, श्रीनिवास कदम, वसंत जगताप, धनंजय गायकवाड,पार्थ निंबाळकर, अॅड.विलास खटके,विजय चव्हाण, हेमंत निंबाळकर, शब्बीर काझी, सचिन सपकळ, मुस्तफा सय्यद उपस्थित होते.

जिजा आणि दाजी; वाचा शरद पवार यांच्या लग्नाची गोष्ट!

यावेळी भरणे यांनी सांगितले की, कोरोनाच्या पाश्‍ र्वभूमीवर राज्यामध्ये रक्ताची टंचाई निर्माण झाली होती. महाविकासआघाडीचे सरकार व प्रशासनाच्या माध्यमातून रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे आवाहन केल्यानंतर इंदापूर तालुक्यातील जनतेने लॉकडाऊनच्या काळामध्ये आत्तापर्यंत दहा हजारापेक्षा जास्त नागरिकांनी रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेतला आहे. अजूनही रक्तदानाची शिबिरे सुरु असून नागरिक उत्सफुर्तपणे रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होत आहेत.

पुण्यातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतीच, आता तुम्हीच तुमचे रक्षक व्हा!

पुणे जिल्ह्यासाठी दहा हजार रक्तदानाचे टार्गेट दिले होते. ते फक्त इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पूर्ण केल्याबद्दल भरणे यांनी रक्तदात्यांचे कौतुक केले. पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पदाचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांच्या कामासाठी करण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी २ कोटी २० लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन भरणे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी जाचकवस्ती येथे विक्रमसिंह निंबाळकर यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये १०५ नागरिकांनी रक्तदान केले. यावेळी जाचकवस्ती सरपंच ज्योती काळे व उपसरपंच दिपक निंबाळकर उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indapur taluka tops in blood donation in the state