esakal | Indapur : दुष्काळ संपवून तालुक्याचा विकास करणार
sakal

बोलून बातमी शोधा

indapur

Indapur : दुष्काळ संपवून तालुक्याचा विकास करणार

sakal_logo
By
डाॅ. संदेश शहा

इंदापूर : तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने पुन्हा आमदार झालो. राष्ट्रीय नेते शरद पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी मला मंत्रिमंडळात मंत्री केले. मंत्री म्हणून मी मुंबईस मिरवण्यासाठी किंवा फोटो सेशन साठी जात नाही तर जनसेवेसाठी जातो. आता आमदारकीची सव्वातीन वर्षे राहिली असून तालुक्यातील लाकडी, निंबोडी परिसर तसेच २२ गावांचा पाण्याचा दुष्काळ संपवून तालुक्याचा पुढील १०० वर्षाचा विचार करून विकास करणार असल्याचे प्रतिपादन सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शहा सांस्कृतिक भवन मध्ये आयोजित युवक मेळाव्यात मंत्री भरणे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर होते.यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे,जिल्हा ध्यक्ष सचिन घोटकुले, प्रताप पाटील,जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सचिन सपकळ, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे,कार्या ध्यक्ष अतुल झगडे, वरिष्ठ उपाध्यक्ष शिवाजी पानसरे, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे,युवक तालुकाध्यक्ष ऍड शुभम निंबाळकर,कार्याध्यक्ष सचिन खामगळ, पुणे जिल्हा युवकउपाध्यक्ष विशाल मारकड, तालुका उपाध्यक्ष अक्षय कोकाटे, दिलीप वाघमारे, सागर मिसाळ उपस्थित होते.

हेही वाचा: पुणे: सीमा भिंतीसाठी ५० कोटींचा खर्च

मंत्री दत्तात्रय भरणे पुढे म्हणाले, युवकांची ताकद निवडणुकीत समजते. जिकडे युवक जास्त, तिकडे विजय ठरलेला आहे.त्यामुळे युवकांनी जनतेचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे. तुम्ही निधीची काळजी करू नका, महाविकास आघाडीच्या माध्यमा तून तुम्हास निधी दिला जाईल. तालुक्यात रस्त्याची कामे झाली असून आता महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा उतरविणे तसेच तालुक्याचा पाणीप्रश्न संपविणे यास प्राधान्य दिले जाईल. निरा नदी कोरडीपडतअसल्याने नवीन धरणासाठी कुठे जागा आहे का याची चाचपणी सुरू आहे. त्यामुळे गावातील गट गट, ग्रामपंचायत, सोसायटी, वैयक्तिक हेवे दावे बाजूस ठेवा, पक्षाची ताकद वाढविण्या साठी एकीचे प्रदर्शन करणे गरजेचे आहे.

राष्ट्रवादी जोडो अभियानाअंतर्गत विरोधी पक्षा तील अनेक चांगले कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, इंदापूर नगरपरिषद , निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी जुन्या, नव्या कार्यकर्त्यांनी संघटितपणे प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर म्हणाले, युवकांनी आपले व्यासपीठ तयार करून प्रशासनावर अंकुश ठेवला पाहिजे कारण सत्तेस काम करण्यास मर्यादा असते मात्र संघटना सर्वकाही करू शकते. त्यामुळेपक्षाने युवकांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी एक नामी संधी दिली आहे. या संधीचे सोनं करून युवकांनी समाजहितास सर्वोच्च प्राधान्य द्यावे.

हेही वाचा: यंदा हिवाळी अधिवेशन दोन आठवड्यांचेच; प्रशासनाची तयारी; ५० कोटींचा खर्च

यावेळी युवक प्रदेशाध्यक्ष महिबूब शेखम्हणाले ,युवक काँग्रेस मध्ये काम करत असताना पक्ष निष्ठा ठेवून काम केल्यास पक्ष त्याची निश्चित दखल घेतो. यातूनच उद्याचा प्रदेशा ध्यक्ष निवडला जाईल. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यात मागील १९ वर्षात जी कामे झाली नाहीत ती केवळ १९ महिन्यात झाली आहेत. पक्ष प्रमुख शरद पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांचे इंदापूर कडे विशेष लक्ष असून मंत्री भरणे यांनी आपली कर्तबगारी सिद्ध केली आहे. त्यामुळे युवक कार्यकर्त्यांनी त्यांना ५० हजार हुन जास्त मताधिक्यांनी निवेदन आणण्याचे नियोजन करावे. त्यासाठी गाव तिथे राष्ट्रवादी व वाड्या वस्त्या तिथे बूथ कमिटी सक्षम करणे गरजेचे आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका युवकअध्यक्ष शुभम निंबाळकर म्हणाले,ताईदादासप्ताहाच्या माध्यमातून रक्तदान, वृक्षारोपण, कोविड केअर केंद्र, कोरोना योद्धा पुरस्कार, लसी करण, राजस्व अभियान आदी उपक्रम राबविले आहेत. प्रास्ताविक कार्याध्यक्ष सचिन खामगळ तर सुत्रसंचलन डॉ. निलेश धापटे व अमोल धापटे यांनी केले. आभार अक्षय कोकाटे यांनी मानले.

loading image
go to top