Indapur News : इंदापूर तहसीलदारांच्या कामकाजावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघर्ष; एकाच दिवशी मोर्चा आणि प्रतिमोर्चाचे आयोजन

NCP Announces Counter Rally in Support of Indapur Tehsildar on November 25 : इंदापूर तहसीलदारांच्या कामकाजावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमनेसामने आले आहेत. भाजपच्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादीने प्रतिमोर्चाची घोषणा केली असून तहसीलदारांवर चुकीची कामे करून घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप केला आहे.
NCP Announces Counter Rally in Support of Indapur Tehsildar on November 25

NCP Announces Counter Rally in Support of Indapur Tehsildar on November 25

esakal
Updated on: 

इंदापूर : इंदापूर तहसीलदारांच्या कथित अनागोंदी कारभाराच्या विरोधात भाजपच्या वतीने 25 नोव्हेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार असतानाच, आता तहसीलदारांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्याच दिवशी प्रतिमोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. चुकीची कामे करून घेण्यासाठी तहसीलदारांवर दबाव टाकला जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी केला. त्यामुळे इंदापुरात तहसीलदारांच्या कामकाजावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात राजकीय संघर्षाला सुरुवात झाल्याचे चित्र आहे.

Loading content, please wait...