
पुणे : महाराष्ट्र कारागृह विभागातील आठ अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींकडून गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक जाहीर करण्यात आले आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला हे पदक जाहीर करण्यात आले. सेवापदक घोषित झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कारागृह व सुधारसेवा विभागाचे अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक सुहास वारके आणि विशेष कारागृह महानिरीक्षक यांनी अभिनंदन केले.