जगातील ४२ टक्के दम्याचे मृत्यू भारतात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Asthama Patients
जगातील ४२ टक्के दम्याचे मृत्यू भारतात

जगातील ४२ टक्के दम्याचे मृत्यू भारतात

पुणे - जगभरात दम्यामुळे (Asthama) दगावणाऱ्या प्रत्येक शंभरामध्ये देशातील ४२ रुग्णांचा (Patients) समावेश आहे. तर, देशातील ९० टक्क्यांहून अधिक रुग्णांना या आजाराची योग्य औषधे मिळत नसल्याची माहिती पुढे आली. ‘पल्मोकेअर रिसर्च अँण्ड एज्युकेशन फाउंडेशन’चे संचालक डॉ. संदीप साळवी यांनी ही माहिती दिली.

डॉ. साळवी आणि त्यांच्या टीमने भारतात इनहेल्ड कॉर्टिकोस्टिरॉइड्सची विक्रीची (इंटरकॉन्टिनेंटल मार्केटिंग सर्व्हिसेस अँड क्विंटाइल्स) माहिती संकलित केली. देशातील औषध विक्रीचा सर्वात अधिकृत स्रोत आहे आणि त्याची तुलना इनहेल्ड कॉर्टिकोस्टिरॉईड्सच्या अपेक्षित विक्रीशी केली. देशात दम्याचे ३४.३ दशलक्ष रुग्ण आहेत. परंतु, इनहेल्ड कॉर्टिकोस्टिरॉईड्सची एकूण विक्री ३८४ दशलक्ष युनिट्स असणे अपेक्षित आहे. परंतु, प्रत्यक्षात ही विक्री केवळ २६.४ दशलक्ष युनिट्सची होती. याचा अर्थ असा की भारतातील ९० टक्क्यांपेक्षा जास्त दम्याच्या रुग्णांना योग्य औषध मिळत नाही, असे साळवी म्हणाले.

दम्यावर इनहेल्ड कॉर्टिकोस्टिरॉईड्स (आयसीएस) हे प्रभावी औषध म्हणून वापरतात. या आजाराच्या मृत्यूची संख्या सातत्याने कमी होत आहे. आपल्या देशात गेल्या तीन दशकांमध्ये दम्याच्या रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. ‘आयसीएस’ औषधांचा कमी आणि इनहेल ब्रॉन्कोडायलेटर औषधांचा अतिवापर हे त्यामागचे कारण असल्याचेही ते म्हणाले.

सद्यःस्थिती

  • देशातील दम्याचे रुग्ण : ३४.३ दशलक्ष

  • जगभरातील या आजाराचे रुग्ण : २६२ दशलक्ष

  • जगभरात मृत्यू : १.९८ लाख

अस्थमा दिनाच्या निमित्ताने या आजाराबद्दल जागरूकता निर्माण केली जाते. रुग्णांना होणारा त्रास आणि त्यातून होणारे मृत्यू कमी करण्यासाठी उपाययोजना शोधण्याची गरज आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन खूप उशीर होण्यापूर्वी कृती आराखडा तयार केला पाहिजे.

- डॉ. संदीप साळवी

Web Title: India 42 Percentage Of The Worlds Asthma Deaths

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top