

Defence Industry Growth
esakal
प्रज्वल रामटेके
पुणे: ‘‘देशातील संरक्षण साहित्याचे उत्पादन एक लाख ७६ हजार कोटी रुपयांवर पोहोचले असून, त्यामध्ये खासगी क्षेत्राचा वाटा सुमारे २५ टक्के इतका आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानामुळे स्फोटके आणि दारूगोळा निर्मिती क्षेत्रात खासगी उद्योग, स्टार्टअप्स आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचा (एमएसएमई) सहभाग वेगाने वाढत आहे. सध्या स्फोटके आणि प्रोपेलंट निर्मितीसाठी १५० हून अधिक कंपन्या परवाना प्रक्रियेत आहेत,’’ अशी माहिती संरक्षण मंत्रालयाचे सचिव (संरक्षण उत्पादन) संजीव कुमार आणि संरक्षण गुणवत्ता आश्वासन महासंचालनालयाचे (डीजीक्यूए) महासंचालक एन. मनोहरण यांनी दिली.