

Tradition, Hospitality, and Devotion: The Fragrant Journey of 'India Gate Presents Naivedyam'
Sakal
पुण्याचा गणेशोत्सव घराच्या चार भिंतींपलीकडे जाऊन रस्त्यांवर, पेठांच्या चौकांमध्ये आणि वाड्यांच्या मोकळ्या प्रांगणात लाखो लोकांच्या गर्दीत फुलतो. रस्त्यारस्त्यांवर उभारलेले भव्य मंडप, ढोल-ताशांच्या तालावर नाचणारे भाविक आणि सर्वसमावेशकतेचा संदेश देणारी आपली संस्कृती हेच या शहराचे खरे वैभव आहे. याच सार्वजनिक गणेशोत्सवाचा अनोखा वारसा, 'अतिथी देवो भव:' ही आपली मूल्ये आणि तिथे अर्पण होणाऱ्या नैवेद्याची महती घराघरांपर्यंत पोहोचवण्यासाठी 'इंडिया गेट प्रेझेंट्स नैवेद्यम्' ही विशेष मालिका रसिकांच्या भेटीला आली आहे. हा व्हिडिओ केवळ एका यात्रेचे चित्रण नाही, तर भारतीय संस्कृतीचा हा मोठा विचार जिवंत करण्याचे एक प्रभावी माध्यम आहे.