

नवी दिल्ली, ता. १४ (वृत्तसंस्था) : भारतात रिझर्व्ह बँकेने अलीकडेच अर्थात रेपो दरात वाढ केली. त्यानंतर अनेक बँकांनी कर्जाचे व्याजदर वाढविले आहेत. मात्र, जगभरातील देशांतील धोरणात्मक व्याजदरांचा विचार करता व्हेनेझुएला, तुर्किये, इराण आणि पाकिस्तान यांसारख्या देशांमध्ये व्याजदर भारताच्या तुलनेत अधिक आहेत. ‘वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स’ने ‘ट्रेडिंग इकॉनॉमिक्स’च्या आधारे ही आकडेवारी एक्स’वर प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार सर्वाधिक व्याजदर असलेल्या पहिल्या ४० देशांत भारताचा समावेश नाही.
व्हेनेझुएला अव्वल; तुर्किये दुसऱ्या क्रमांकावर
सर्वाधिक व्याजदर असलेल्या देशांच्या यादीत व्हेनेझुएला ५८.९३ टक्के दरासह पहिल्या क्रमांकावर आहे. तुर्कियेचा व्याजदर ३७ टक्के असून, तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. अर्जेंटिनामध्ये २९ टक्के, झिम्बाब्वेमध्ये २७.५० टक्के, लेबनॉनमध्ये २५ टक्के आणि मालावीमध्ये २४ टक्के व्याजदर आहे.
इराण आठव्या क्रमांकावर
अमेरिकेबरोबरच्या युद्धामुळे आर्थिक दबावाचा सामना करणाऱ्या इराणचा व्याजदर २३ टक्के आहे. या दरासह इराण यादीत आठव्या क्रमांकावर आहे. नायजेरियाचाही व्याजदर २३ टक्के आहे.
रशियात अधिक दर
रशिया, ब्राझील, पाकिस्तानात व्याजदर चढेच आहे. रशियामध्ये व्याजदर १४ टक्के असून, या देशाचा यादीत १८ वा क्रमांक आहे. ब्राझीलचा व्याजदर १३.७५ टक्के असून, तो २१ व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानमध्ये ११.५० टक्के व्याजदर असून, या देशाचा यादीत २८ वा क्रमांक आहे.
भारतात ५.५० टक्के
भारतातील धोरणात्मक व्याजदर ५.५० टक्के असल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे व्हेनेझुएला, तुर्किये, इराण, रशिया आणि पाकिस्तानच्या तुलनेत भारतातील दर कमी आहे.
सर्वाधिक धोरणात्मक व्याजदर असलेले दहा देश (आकडे टक्क्यांत)
१. व्हेनेझुएला ः ५८.९३
२. तुर्किये ः ३७
३. अर्जेंटिना ः २९
४. झिम्बाब्वे ः २७.५
५. लेबनॉन ः२५
६. मलावीः २४
७. नायजेरिया ः २३
८. इराणः२३
९. इजिप्त ः १९
१०. सिएरा लिओनः १७.२५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.