

संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेच्या
भारताने पाकिस्तानला सुनावले
न्यूयॉर्क, ता. २४ (पीटीआय) : जम्मू-काश्मीर हा भारताचा पूर्णपणे अंतर्गत विषय असल्याचे भारताने ठामपणे स्पष्ट केले. चीन आणि पाकिस्तानने आयोजित केलेल्या सुरक्षा परिषदेच्या अनौपचारिक बैठकीत भारताचे संयुक्त राष्ट्रांतील कायमस्वरूपी प्रतिनिधी राजदूत पर्वथनेनी हरीश यांनी ही भूमिका मांडली.
पाकिस्तानच्या प्रतिनिधीने केलेल्या वक्तव्यांचा संदर्भ देत हरीश म्हणाले की, एका सह-अध्यक्षाकडून निष्पक्ष वर्तणुकीची अपेक्षा असताना या व्यासपीठाचे राजकीयीकरण करणे अनाकलनीय आहे. जम्मू-काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि कायम राहील, असे त्यांनी ठामपणे सांगितले. पाकिस्तानचे प्रतिनिधी असीम इफ्तिकार अहमद यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर भारताने हे प्रत्युत्तर दिले. जम्मू-काश्मीर आणि लडाख हे भारताचे अविभाज्य भाग असल्याचे भारताने सातत्याने स्पष्ट केले आहे. सुरक्षा परिषदेच्या सुधारणांबाबत बोलताना हरीश यांनी जुन्या मध्यस्थी आराखड्यांचा आढावा घेण्याची गरज व्यक्त केली. तसेच, सुरक्षा परिषदेच्या रचनेत बदल करून भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व देण्याची मागणीही भारताने पुन्हा एकदा लावून धरली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.