देशातील सर्वात मोठे ऑटोमेशन एक्स्पो १६ ऑगस्टपासून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Atomation Expo

ऑटोमेशन तंत्रज्ञानाचे आशियातील दुसरे सर्वात मोठे आणि देशातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन असलेला ऑटोमेशन एक्स्पो यंदा पुन्हा भरणार आहे.

देशातील सर्वात मोठे ऑटोमेशन एक्स्पो १६ ऑगस्टपासून

पुणे - ऑटोमेशन तंत्रज्ञानाचे आशियातील दुसरे सर्वात मोठे आणि देशातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन असलेला ऑटोमेशन एक्स्पो यंदा पुन्हा भरणार आहे. एक्स्पो १५ व्या आवृत्तीचे उद्‍घाटन उद्योगक्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये १६ ऑगस्ट रोजी मुंबईतील गोरेगावमध्ये असलेल्या एनईसी कॉम्प्लेक्समधील प्रदर्शन केंद्राच्या सभागृह एक मध्ये होणार आहे.

कोरोनाच्या निर्बंधांमुळे २०२० आणि २०२१ या दोन्ही वर्षी एक्‍स्पो प्रत्यक्षात आयोजित करता आला नव्हता. हा एक्स्पो लोकांना एकमेकांशी जोडत आहे, आणि व्यावसायिक संधी निर्माण करीत आहे. एक्स्पोने मेक इन इंडिया, स्कील इंडिया आणि वोकल फॉर लोकल तसेच पीएलआय योजना यासारख्या वर्षांतील विविध धोरणात्मक उपक्रमांनी उत्पादन क्षेत्राला आणखी प्रोत्साहन दिलेले आहे.

विविध क्षेत्राचे उदयोन्मुख तंत्रज्ञान असणार

ऑटोमेशन एक्स्पोमध्ये फॅक्टरी ऑटोमेशन, प्रक्रिया स्वयंचलन आणि नियंत्रण, रोबोटिक्स, फिल्ड इन्स्ट्रुमेंटेशन, नियंत्रण कक्ष, आयआयओटी, सायबर सुरक्षा, हायड्रॉलिक्स आणि न्यूमॅटिक्स, उद्योग ४.० असे उदयोन्मुख तंत्रज्ञान असणार आहे. त्यासह बिल्डींग ऑटोमेशन झोनही यंदा मांडण्यात येणार आहे.

या विषयांवर होणार चर्चा ...

  • सीइओ कॉन्क्लेव्ह

  • आयआयओटी-मेटाडाटावरील कॉन्फरन्स

  • बिल्डींग ऑटोमेशन

पर्यावरणाच्या संरक्षणासाठी ऑटोमेशन

उदयोन्मुख तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेल्या स्टार्टअप्सकडून एक्स्पोला मिळणारा पाठिंब्याने आम्ही भारावून गेलो आहोत. कोरोनाने डिजिटल परिवर्तनाच्या आवश्यकतेला अधिक बळकटी मिळालेली आहे. त्यामुळे प्रगत स्वयंचलन तंत्रज्ञानाच्या मागणीत वाढ झाली आहे. या परिवर्तनामुळे मानवी नियंत्रणापलीकडील शक्तीमुळे येणाऱ्या अडचणीवर अधिक चांगल्या प्रकारे मात करता येईल.

- डॉ. एम. आरोकीयास्वामी, संस्थापक, आयइडी कम्युनिकेशन्स आणि मेगा इव्हेंट

एक्स्पोविषयी...

अधिक माहिती आणि नोंदणीकरिता -

www.automationindiaexpo.com

इमेल - jyothi@iedcommunications.com

मोबाईल क्रमांक - ९९२०४८९६६७, ९८२००९३६६७

परिषदांचे तपशील आणि विशेष वैशिष्टे - www.automationindiaexpo.com

टॅग्स :IndiaMumbaiAutomation