
ग्रामीण भागात तंबाखूचे व्यसन घराघरांत पोहोचले आहे. तरुण मुलेच नव्हे तर महिलासुद्धा या व्यसनच्या आहारी आहेत. शहारातही तंबाखूचे व्यसनी मोठ्या संख्येने आहे. दुष्परिणामांची कितीही माहिती दिली तरी हे व्यसन आटोक्यात येत नसल्याने तंबाखूच्या बेकायदेशीर विक्रीची त्रिसूत्री मोडून काढण्यासाठीची ‘वर्ल्ड ॲन्टी काउंटर फिटिंग डे’निमित्त ‘पीएमआय इन इंडिया’ने सरकारसोबत करार केला आहे. नागरिकांना व्यसनांच्या विळख्यातून सोडविणे हेच मुख्य ध्येय असल्याचे आयपीएम इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक नवनील कार यांनी सांगितले.