

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता.२३ ः भारत आणि अमेरिकेदरम्यान फेब्रुवारी महिन्यात जाहीर झालेल्या अंतरिम व्यापार करारावर उभय देशांमध्ये आज उच्चस्तरीय चर्चा सुरु झाली. अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर या चर्चेसाठी दोन दिवसांच्या दौऱ्यावर दिल्लीत आले आहेत.
दिल्लीतील वाणिज्य भवनात ही बैठक होत असून त्यात वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल आणि भारताचे मुख्य समन्वयक दर्पन जैन सहभागी झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि ग्रीर यांनी आज नवी दिल्लीत भेट घेतली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांनी सुरू केलेल्या अंतरिम करारावरील बोलणी पुढे नेण्यासाठी ही बैठक झाली. अमेरिकन निर्यातदारांसाठी बाजारपेठ खुली होईल आणि दोन्ही देशांना त्याचा फायदा मिळेल, अशा दोन्ही देशांना समान फायदा देणारा न्याय्य व्यापार करार करण्यावर अमेरिका लक्ष केंद्रित करून आहे,’ अशी पोस्ट अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर यांनी ग्रीर यांचे दिल्ली आगमनप्रसंगी स्वागत करताना केली.
अमेरिकेबरोबर भारताच्या हिताच्या विरोधात आणि तोट्याच्या कुठल्याही व्यापार करारावर घाईघाईने सही करण्याची अजिबात गरज नाही. पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे मित्र ट्रम्प यांचे लांगूलचालन करणे बंद केले पाहिजे.
जयराम रमेश, प्रभारी सरचिटणीस, काँग्रेस प्रसिद्धी विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.